शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
2
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
3
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
4
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
5
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
6
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
7
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
8
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
9
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
10
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
11
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
12
मुत्सद्देगिरी हेच औषध! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'ने भारतीय फार्मा कंपन्यांचे काय होणार?
13
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
14
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
15
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
16
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
17
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
18
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
19
कोस्टल रोडवर पुन्हा अपघात; कारच्या धडकेत दोघे जखमी
20
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं

'हौसेने आणली नवरी, दुसऱ्या दिवशीच बावरी'; बनावट लग्न लावणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2022 19:29 IST

नवरीस मैत्रिणीसोबत पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना नवरदेवाने पकडले

बीड :लग्नाळू तरुणाला खासगी एजंटाने स्थळ आणले. पसंती झाल्यावर मुलीच्या आईला नवरदेवाने अडीच लाख देण्याची तयारी दर्शवली. ५ डिसेंबरच्या मुहूर्तावर वसमत (जि. परभणी) येथे नोटरी करून करारपत्रक करून विवाह लावला; परंतु दुसऱ्याच दिवशी मध्यरात्री नवरीने मला इथे राहयचे नाही, अशी टूम लावली. दुसऱ्या दिवशी सकाळी तिने मैत्रिणीच्या मदतीने पळून जाण्याचा प्रयत्न केला; पण नवरदेवाने पकडले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले. यातून बनावट लग्न लावणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला.

त्याचे झाले असे, आष्टी तालुक्यातील वैभव (नाव बदललेले) हा बीडमध्ये सायकल मार्ट चालवून उदरनिर्वाह भागवतो. वयाची तिशी ओलांडल्यावरही लग्न होत नसल्याने तो बेचैन होता. बीडमध्ये बहिणीच्या घरी तो राहतो. बहीण व मेहुण्याने त्याच्यासाठी वधूशोध सुरू केला तेव्हा त्यांना एजंट नाना पाटील नुरसारे याच्याकडे भरपूर स्थळ असल्याची माहिती कळाली. त्यामुळे दोघांनी त्याच्याशी संपर्क केला. ३ डिसेंबरला बहिणीच्या घरी बैठक झाली, त्यात नाना पाटील नुरसारे याने वैभवला दुर्गा बालाजी माने या तरुणीचा फोटो दाखवला. फोटोत वैभवने तिला पसंत केल्यावर नाना पाटील नुरसारे याने ती हिंगोलीच्या औंढा नागनाथ येथील सिद्धार्थनगरातील रहिवासी असून, तिला वडील नसल्याचे सांगितले. लग्नासाठी अडीच लाख रुपये मुलीच्या आईला द्यावे लागतील, अशी अट नुरसारे याने घातली. दोन दिवसांत पैशांची तजवीज करून ५ डिसेंबरला मुहूर्त ठरला. परभणी जिल्ह्यातील वसमत येथे करण्याचे निश्चित झाले. वसमत येथे शंभर रुपयांच्या मुद्रांकावर दुर्गा माने हिचा वैभवशी विवाह करारनामा केला. पुष्पहार व मणी मंगळसूत्र घालून विवाह लावल्यानंतर दुर्गाला घेऊन वैभव मोठ्या हौसेने बीडला पोहोचला. त्याआधी अडीच लाख रुपयेदेखील दिले.

मरेन नाही तर मारीन...दरम्यान, ६ रोजी मध्यरात्री नवरी बनून आलेल्या दुर्गाने वैभवची बहीण व मेहुण्यास मला इथे राहायचे नाही, असे सांगितले. त्यांनी तिला समजावण्याचा प्रयत्न केला तेव्हा मी तुम्हाला मारीन, नाही तर जीवाचे बरे-वाईट करून घेईन, अशी धमकी तिने दिली. त्यानंतर रात्रभर सर्वजण जागेच राहिले.

दुर्गाला घेऊन जायला आली अन् अडकली...दुसऱ्या दिवशी सकाळी मीना बळीराम बागल (२७, रा. छोटेवाडी, ता. माजलगाव) ही बीडला पोहोचली. तिने वैभवच्या मेहुण्यास फोन करून आपण दुर्गाला माहेरी घेऊन जाण्यासाठी आले असून, बसस्थानकात तिला घेऊन या, असे सांगितले. मेहुण्याने नकार दिल्यावर घर शोधत ती दुर्गाजवळ पोहोचली. पसार होण्याच्या तयारीत असतानाच दुर्गासह मीनाला वैभवने पकडले. सकाळी १० वाजताच तो त्या दोघींना घेऊन शहर ठाण्यात पोहोचला. वैभवच्या फिर्यादीवरून मीना बळीराम बागल (२७, रा. छोटेवाडी, ता. माजलगाव), दुर्गा बालाजी माने (१८, रा. मानवत, जि. परभणी), नाना पाटील नुरसारे, बालाजी भालेकर, मनकर्णा माने, आकाश माने (सर्व रा. औंढा नागनाथ, जि. हिंगोली), विनोद खिल्लारे (रा. हिंगोली) यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा नोंद झाला.

तीन दिवसांची पोलिस कोठडीबनावट नवरी बनून आलेली दुर्गा माने हिंगोलीची नव्हे तर माजलगाव तालुक्यातील निघाली. तिच्यासह मैत्रीण मीना बागल या दोघींना पोलिस निरीक्षक रवी सानप, सहायक निरीक्षक घनशाम अंतरप, हवालदार मीरा रेडेकर, पोना. ज्योती कांबळे, अश्विनी दगडखैर, अंमलदार दीपाली ठोंबरे, अविनाश सानप यांनी ताब्यात घेतले. त्यांना ७ रोजी न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. अधिक तपास उपनिरीक्षक बिभीषण जाधव करत आहेत.

या टोळीने बनावट लग्न लावून पैसे उकळत अनेकांना फसविलेले असू शकते. एकूण सात जणांवर गुन्हा नोंदविला असून, दोघी ताब्यात आहेत. पाच आरोपींचा शोध सुरू आहे.- रवी सानप, पोलिस निरीक्षक बीड शहर

टॅग्स :marriageलग्नBeedबीडCrime Newsगुन्हेगारी