शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

परळीत जीपची काच फोडून साडेतीन लाखांची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2018 00:22 IST

शहरातील अंबाजोगाई रोडवरील असलेल्या एका एजन्सीत ट्रॅक्टर खरेदीसाठी आलेल्या धारुर तालुक्यातील फकीर जवळा येथील एका व्यक्तीचे ३ लाख ६० हजार रुपये जीपच्या काचा फोडून चोरल्याची घटना शनिवारी भरदुपारी घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कपरळी : शहरातील अंबाजोगाई रोडवरील असलेल्या एका एजन्सीत ट्रॅक्टर खरेदीसाठी आलेल्या धारुर तालुक्यातील फकीर जवळा येथील एका व्यक्तीचे ३ लाख ६० हजार रुपये जीपच्या काचा फोडून चोरल्याची घटना शनिवारी भरदुपारी घडली.फकीर जवळा येथील पंडित जगन्नाथराव राठोड (३६) हे ट्रॅक्टरद्वारे ऊस वाहतूक व्यवसाय करतात. दिवाळी निमित्त ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी पंडीत राठोड हे परळीत शनिवारी आले. दुपारी १ वाजण्याच्या सुमारास येथील अंबाजोगाई रोडवरील ट्रॅक्टरच्या एजन्सी कार्यालयासमोर जीप उभी करुन लॉक केली व एजन्सीत गेले. यादरम्यान अज्ञात व्यक्तीने काचा फोडून जीपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर जीपमधील ३ लाख ६० हजार रुपयांची रक्कम चोरून नेली. एजन्सीमधून बाहेर आल्यानंतर जीपच्या काचा फुटलेल्या व त्यातील रक्कम लंपास झाल्याचे राठोड यांच्या निदर्शनास आले. त्यांनी हा प्रकार परळी शहर ठाण्याला कळविला. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाला भेट दिली.राठोड यांच्या सोबत घरातील इतर तिघे जण होते. राठोड यांनी त्यांच्या मेव्हण्याच्या अंबाजोगाई येथील बँकेच्या खात्यातून धनादेशाद्वारे ३ लाख ६० हजार रु पये काढले होते. ते पैसे परळीत आणले होते. फकीर जवळा येथील मित्राची जीप भाड्याने घेऊने ते परळीत ट्रॅक्टर खरेदीसाठी आले होते. ५० हजार रु पयांचे सात बंडल ३ लाख रुपये व १०० रु पयाचे दहा हजाराचे एक बंडल असे एकूण ३ लाख ६० हजार रु पये वाहनामध्ये ठेवले होते. ते अज्ञात इसमाने पळवून नेल्याचे राठोड यांनी सांगितले. सीसीटीव्ही मध्ये दोघांचे चेहरे दिसत असल्याचे सांगण्यात आले. भर दुपारी घडलल्या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

टॅग्स :BeedबीडtheftचोरीCrime Newsगुन्हेगारी