शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

उसणे पैसे परत मागितले, संतप्त दाम्पत्याने भररस्त्यात केला वृद्धाचा खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2022 14:05 IST

तू खूप पैसेवाला झालास का? असे म्हणत दाम्पत्याने भररस्त्यात केली मारहाण

माजलगाव (बीड) : शेती खरेदीसाठी उसणवारीवर दिलेले पाच लाख रुपये परत मागितल्याच्या कारणावरून संतप्त दाम्पत्याने एका वृद्धाची भररस्त्यात धारदार शस्त्राने हत्या केली. ही घटना १ मे रोजी सायंकाळी सात वाजता तालुक्यातील मंजरथ येथे घडली. या प्रकरणी पती-पत्नीवर गुन्हा नोंद झाला असून, त्यांना पोलिसांनी अटक केली. मारुती चुरामन घटे (६५, रा. मंजरथ, ता. माजलगाव) असे मयताचे नाव आहे.

चार वर्षांपूर्वी शेती घेण्यासाठी गावातीलच राजाभाऊ सर्जेराव गायकवाड व दैवशाला राजाभाऊ गायकवाड यांनी त्यांच्याकडून पाच लाख रुपये उसणे घेतले होते. चार वर्षे उलटूनही गायकवाड दाम्पत्य पैसे परत करीत नसल्याने मारुती घटे यांनी तगादा लावला होता. या व्यवहारावरूनच १ मे रोजी सायंकाळी ७ वाजता मंजरथ येथील स्थानकावर त्यांच्यात वाद सुरू होता. तू खूप पैसेवाला झालास का? असे म्हणत दैवशाला गायकवाड यांनी मारुती घटे यांचा हात धरला तर राजाभाऊ गायकवाड याने सुरीने छातीत, डोक्यात, खांद्यावर सपासप वार केले. यात रक्तस्राव होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. मयत मारुती घटे यांचा मुलगा राजा घटे यांच्या फिर्यादीवरून राजाभाऊ सर्जेराव गायकवाड, दैवशाला राजाभाऊ गायकवाड यांच्या विरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

गावात तणावाचे वातावरणया घटनेने गावात काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनास्थळी साहायक पोलीस अधीक्षक रश्मिथा एन. राव, सहायक निरीक्षक विजयसिंह जोनवल, उपनिरीक्षक सचिन दाभाडे यांनी भेट दिली. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला.

तीन दिवसांची पोलीस कोठडीदरम्यान, राजाभाऊ गायकवाड व दैवशाला गायकवाड या दाम्पत्यास माजलगाव येथील न्यायालयात २ मे रोजी हजर केले. न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली, अशी माहिती सहायक निरीक्षक विजयसिंह जोनवाल यांनी दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीड