शिरूर कासार : तालुक्यात कोरोनाने थैमान घातले होते. आता कुठे रुग्ण संख्या घटू लागली आहे. अशा काळात अनेकांनी जमेल तशी मदत केली. त्यात अन्नदानापासून नित्योपयोगी वस्तू, साहित्य कोरोना सेंटरला दिले जात होते. परंतु, कोरोनामुक्त महिलांची साडी चोळी देऊन बोळवण करण्याचा पहिलाच उपक्रम बावी ग्रामपंचायतीने राबविला असून या उपक्रमामुळे सर्वत्र कौतुक होत आहे.
पंकजा मुंडे, खासदार डॉ. प्रितम मुंडे यांच्या आवाहनानुसार शिरूर येथे सिद्धेश्वर इंग्लिश स्कूलमध्ये गोपीनाथराव मुंडे प्रतिष्ठान व शांतीवन यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत कोविड सेंटर सुरू करण्यात आले. या सेंटरसाठी अनेकांनी मदतीचे हात पुढे केले. त्यात काहींनी अन्नदान तर काहींनी नित्योपयोगी साहित्य देऊन सहभाग घेतला. मात्र, बावी ग्रामपंचायतीने नवनाथ ढाकणे यांची संकल्पना प्रत्यक्षात उतरवली व कोरोनामुक्त महिलांना सन्मानाने साडी चोळी देऊन त्या कोरोनामुक्त महिला भगिनींना भावाची माया देण्याचे काम केले. गुरुवारी शांतीवनचे दीपक नागरगोजे यांच्या उपस्थितीत साडी चोळी देण्यात आली.
यावेळी विजय गोल्हार, जिल्हा परिषद सदस्या सविता बडे, दशरथ वणवे, माजी पंचायत समिती सभापती बाबूराव केदार, बावीचे सरपंच बाळूकाका ढाकणे, डाॅ. मधुसुदन खेडकर, एम. एन. बडे, माऊली पानसंबळ, संतोष ढाकणे, ज्ञानदेव केदार, दादा रोकडे, सावळेराम जायभाये आदींची उपस्थिती होती.
===Photopath===
030621\vijaykumar gadekar_img-20210603-wa0021_14.jpg