शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

१७ लाखांत आरोग्यसेवक पदाचा 'बोगस' बाजार; बेरोजगारांना लुटणाऱ्या रॅकेटचा बीडमध्ये पर्दाफाश

By सोमनाथ खताळ | Updated: February 4, 2026 12:07 IST

आरोग्य विभागात बोगस नियुक्ती पत्रांचा धुमाकूळ; लाखाेंचा गंडा घालणारे रॅकेट सक्रिय

बीड: आरोग्य विभागातील भरती घोटाळ्याचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाहीये. आरोग्यसेवक (क) या पदाचे बोगस नियुक्ती आदेश देऊन बेरोजगारांची १५ ते १७ लाख रुपयांना फसवणूक करणारे एक मोठे रॅकेट जिल्ह्यात सक्रिय झाल्याचे उघड झाले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या बोगस आदेशांवर चक्क उपसंचालकांच्या पत्रावर धाराशिवच्या जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांची स्वाक्षरी स्कॅन करून लावण्यात आली आहे. हेच आदेश आता हाती लागले आहेत.

या रॅकेटने फसवणुकीसाठी कागदपत्रांचा बनाव रचला आहे. काही उमेदवारांना दिलेल्या आदेशावर 'उपसंचालक कार्यालय, धाराशिव' असा उल्लेख आहे. मात्र, वस्तुस्थिती अशी आहे की, धाराशिव येथे आरोग्य विभागाचे उपसंचालक कार्यालयच अस्तित्त्वात नाही; धाराशिवचा कारभार लातूर उपसंचालक कार्यालयातून चालतो. तसेच पुणे उपसंचालक कार्यालयाच्या नावे देण्यात आलेल्या आदेशाचा फॉरमॅटही पूर्णपणे चुकीचा असल्याचे स्पष्ट झाले आहे. अद्याप तरी उमेदवारांनी याची लेखी तक्रार कोठेही दिली नसली तरी त्यांची धावपळ मात्र सुरू झाली आहे. हे उमदेवार बीडच नव्हे तर धाराशिव, यवतमाळ, पुणे, बुलढाणा, जालना आदी जिल्ह्यांतील असल्याची माहिती आहे.

१७ लाखांपर्यंत वसुलीमिळालेल्या माहितीनुसार, आरोग्यसेवक पदासाठी एका उमेदवाराकडून १५ ते १७ लाख रुपये उकळण्यात आले आहेत. बनावट आदेश हाती पडल्यानंतर आणि नियुक्तीसाठी गेल्यावर आपली फसवणूक झाल्याचे उमेदवारांच्या लक्षात आले. आता हे फसवणूक झालेले तरुण पैसे घेणाऱ्या एजंटांचा शोध घेत आहेत.

बीडमध्ये यापूर्वीही घोटाळायापूर्वीही बीडमध्ये भरती घोटाळाप्रकरणी गुन्हे दाखल झाले होते. मात्र, तरीही छुप्या पद्धतीने हे रॅकेट पुन्हा सक्रिय झाले आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बनावट सह्या आणि अस्तित्त्वात नसलेल्या कार्यालयांचे शिक्के वापरून सुशिक्षित बेरोजगारांचे आयुष्य उद्ध्वस्त केले जात आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून मुख्य सूत्रधारांना बेड्या ठोकाव्यात, असे आव्हान आता पोलिसांसमोर आहे.

म्हणे, तीन महिने ट्रेनिंग घ्याबोगस नियुक्ती आदेश दिल्यानंतर या उमेदवारांना मुंबईतच तीन महिने ट्रेनिंग घ्यावे लागेल, असे सांगण्यात येते. विशेष म्हणजे, ही ट्रेनिंग कोणत्याही शासकीय रुग्णालयाऐवजी खासगी अथवा ट्रस्टशी संलग्न असलेल्या रुग्णालयात दिले जात असल्याचे सुत्रांनी सांगितले आहे. फसवणुकीचा हा बनाव अधिक खरा वाटावा, यासाठी हा ट्रेनिंगचा घाट घातला जात असल्याची चर्चा आहे.

एफआयआर दाखल करणारमी बनावट आदेश पाहिले. आमच्याकडे उपसंचालक कार्यालय नाही. तसेच माझी बनावट सही वापरली आहे. असे कोणतेही आदेश आम्ही दिलेले नाहीत. आता यासंदर्भात सीईओ यांच्याशी बोलून एफआयआर दाखल करणार आहे.- डॉ. सतीश हरिदास, जिल्हा आरोग्य अधिकारी, धाराशिव

English
हिंदी सारांश
Web Title : Fake Health Worker Job Racket Busted in Beed; Unemployed Scammed.

Web Summary : A massive fake recruitment racket promising health worker jobs has been exposed in Beed. Unemployed individuals were defrauded of ₹15-17 lakhs using forged appointment letters with falsified signatures. Victims are from multiple districts and training was to be held in private hospitals.
टॅग्स :Beed Crimeबीड क्राईम मराठी बातम्याCrime Newsगुन्हेगारीBeedबीड