राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रेरणेने बाजीराव भय्या धर्माधिकारी मित्रमंडळाच्या वतीने दिनांक ११ ऑगस्ट रोजी स्व. श्री. माणिक बाजीराव धर्माधिकारी सभागृह, आंबेवेस, परळी वैजनाथ येथे "रक्तदान शिबिर" आयोजित करण्यात आले होते. सकाळी या शिबिराचा शुभारंभ डॉ. सुरेश चौधरी, श्रीकांत मांडे, नारायणदेव गोपनपाळे, जाबेरखाॅं पठाण, प्रभाकर देशमुख, डॉ. गुरुप्रसाद देशपांडे, भालचंद्र तांदळे, विलास ताटे, अरुणराव टिंबे, रघुनाथराव कावरे, वैजनाथ बागवाले, अमर देशमुख, अनंत इंगळे, रमेश चौंडे, अनिल अष्टेकर, अजिज कच्छी, जयराज देशमुख, गोविंद कुकर, रवी मुळे, के. डी. उपाडे, शंकर कापसे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला.
हे रक्तदान शिबिर परळीत गावभागाची एक परंपरा बनली असून, अविरतपणे ही सेवा सुरू ठेवली पाहिजे, असे प्रतिपादन डॉ. सुरेश चौधरी यांनी केले. दरवर्षी वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येते. गेल्या दहा वर्षांपासून सातत्याने घेण्यात येणारा व मोठ्या सहभागाचे शिबिर म्हणून हा सामाजिक उपक्रम परळीत अग्रेसर ठरलेला आहे.
दर वर्षी नवनवीन रक्तदात्यांना प्रोत्साहित करून रक्तदानाचे कार्य रुजविण्याबाबत जागृती करणारा परळीतील हा उपक्रम आहे. यावर्षीही या शिबिरात रक्तदात्यांची उत्स्फूर्तता मिळाली. भालचंद्र रक्तपेढी लातूरद्वारा या शिबिरात रक्तदान प्रक्रिया पूर्ण केली. भालचंद्र रक्तपेढी लातूरचे डॉ. योगेश गवसाणी, दिगंबर पवार, किशोर पवार, जयप्रकाश सूर्यवंशी, अरुण कासले, बालाजी वेदपाठक, नितीन क्षीरसागर, अन्सार शेख आदींनी सेवा बजावली.
या शिबिरात तब्बल १११ रक्तदात्यांनी रक्तदान केले.या शिबिराचे विशेष म्हणजे महिला रक्तदात्यांनी हिरीरीने सहभाग घेतला तर काही दाम्पत्यांनी जोडीने येऊन रक्तदान केले. कोरोनाकाळ असतानाही मोठ्या प्रमाणावर रक्तदान शिबिराला मिळालेला प्रतिसाद या शिबिराची यशस्वीता ठरली. शिबिर यशस्वी करण्यासाठी बाजीराव भय्या धर्माधिकारी मित्रमंडळाने अथक परिश्रम घेतले.
120821\12bed_2_12082021_14.jpg