शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
2
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
3
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
4
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
5
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
6
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
7
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
8
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
9
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
10
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
11
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
12
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
13
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
14
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
15
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
16
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
17
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
18
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
19
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
20
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 

बीड जिल्हा रूग्णालयात रेमडेसिवीरचा काळाबाजार; इंजेक्शन दिले एक अन् नोंद पाचची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 3:13 PM

Black market of remedesivir injection : बीड तालुक्यातील आंबीलवडगाव येथील भिमराव खराडे हे २ ऑगस्ट रोजी जिल्हा रूग्णालयात दाखल झाले.

ठळक मुद्देरेमडेसिवीर इंजेक्शन देताना नातेवाईक अथवा रूग्णाची सही अथवा अंगठा घेणे बंधनकारक आहे.

- सोमनाथ खताळबीड : जिल्हा रूग्णालयातील उपचाराबद्दल तक्रारी वाढू लागल्या आहेत. तसेच एका वृद्धाला १२ दिवसांत केवळ एकवेळेस सलाईन लावली. तर एकदा रूग्णाच्या मुलाकडून रेमडेसिवीर इंजेक्शन (  Remedesivir Injection ) दिल्याची स्वाक्षरी घेतली. त्यानंतर ना सलाईन लावली ना सही घेतली. परंतू कागदोपत्री पाच इंजेक्शन दिल्याची नोंद आहे. यावरून रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार होत असल्याचे दिसत असून नातेवाईकांनी चौकशीची मागणी केली आहे.

बीड तालुक्यातील आंबीलवडगाव येथील भिमराव खराडे हे २ ऑगस्ट रोजी जिल्हा रूग्णालयात दाखल झाले. कोरोना चाचणी ( Corona Test ) निगेटिव्ह असल्याने आणि धाप लागत असल्याने त्यांना संशयित वॉर्डात दाखल केले. तेव्हापासून आतापर्यंत खराडे यांच्या प्रकृतीत सुधारणा झालेली नाही. उपचारासाठी आतापर्यंत केवळ दोन वेळा सलाईन लावली. त्यातही एकवेळा आऊट गेली. तेव्हाही कर्मचाऱ्यांनी लक्ष दिले नसल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. दरम्यान, रेमडेसिवीर इंजेक्शन देताना नातेवाईक अथवा रूग्णाची सही अथवा अंगठा घेणे बंधनकारक आहे. परंतू खराडे रूग्णाबाबत मुलगा भाऊसाहेब यांची केवळ एकचवेळेस सही घेतली. त्यानंतर सही घेतलीच नाही. तर दुसऱ्या बाजूला भिमराव खराडे यांना पाच इंजेक्शन दिल्याची नोंद आहे. यावरून पुन्हा एकदा जिल्हा रूग्णालयात इंजेक्शनचा काळाबाजार सुरू झाल्याचे दिसत आहे. या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी जाेर धरू लागली आहे.

इंजेक्शन दिल्याची स्वाक्षरी एकदाचरेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा मुबलक आहे. रूग्णाला इंजेक्शन दिल्याची स्वाक्षरी एकदाच घेतली जाते. मी माहिती घेतली असता पाचही इंजेक्शन दिलेले आहेत. तरीही मी थोडी खात्री करतो.- डॉ.सुरेश साबळे, जिल्हा शल्य चिकित्सक बीड

चौकशी करावी १२ दिवसांपासून माझे वडील उपचार घेत आहेत. आतापर्यंत दोनच वेळा सलाईन लावली. त्यातही एकवेळा आऊट गेली. तरीही लक्ष दिले नाही. तसेच रेमडेसिवीर इंजेक्शनबाबत केवळ एकदाच स्वाक्षरी घेतली. कागदावर मात्र, पाच इंजेक्शनची नोंद आहे. याची चौकशी करून उपचाराकडे लक्ष द्यावे.- भाऊसाहेब खराडे, रूग्णाचा मुलगा

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याremdesivirरेमडेसिवीरBeed civil hospitalजिल्हा रुग्णालय बीडBeedबीड