शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
4
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
5
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
6
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
7
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
8
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
9
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
10
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
11
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
12
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
13
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
14
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
15
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
16
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
17
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

आडसकर, क्षीरसागर, धसांची ताकद भाजपाची जमेची बाजू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2019 12:35 AM

केज विधानसभा मतदारसंघाने लोकसभेच्या पोटनिवडणुकीसह गेल्या तीनही निवडणुकीत भाजपाला आघाडी दिली आहे. २००९ मध्ये डॉ. विमल मुंदडा (राष्ट्रवादी), २०१२ मध्ये झालेल्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीत पृथ्वीराज साठे (राष्ट्रवादी) तर २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीत प्रा. संगीता ठोंबरे (भाजपा) निवडून येत राहिले तरी लोकसभा निवडणुकीत मात्र, भाजपाच्या गोपीनाथ मुंडे यांनाच आघाडी मिळाली होती.

ठळक मुद्देलोकमत विशेष : राष्ट्रवादी काँग्रेसला अंतर्गत गटबाजीचा बसणार फटका?

अविनाश मुडेगावकर ।लोकमत न्यूज नेटवर्कअंबाजोगाई : केज विधानसभा मतदारसंघाने लोकसभेच्या पोटनिवडणुकीसह गेल्या तीनही निवडणुकीत भाजपाला आघाडी दिली आहे. २००९ मध्ये डॉ. विमल मुंदडा (राष्ट्रवादी), २०१२ मध्ये झालेल्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीत पृथ्वीराज साठे (राष्ट्रवादी) तर २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीत प्रा. संगीता ठोंबरे (भाजपा) निवडून येत राहिले तरी लोकसभा निवडणुकीत मात्र, भाजपाच्या गोपीनाथ मुंडे यांनाच आघाडी मिळाली होती.या मतदारसंघावर तसा कै. डॉ. विमल मुंदडा यांचा मोठा प्रभाव होता. मुंदडा यांच्या निधनानंतर पोटनिवडणुकीत मुंदडांच्या कुटुंबात उमेदवार उपलब्ध नसल्याने पृथ्वीराज साठे यांना उमेदवारी देण्यात आली. नंतर झालेल्या २०१४ च्या निवडणुकीत नमिता मुंदडा व संगीता ठोंबरे यांच्यात झालेल्या लढतीत संगीता ठोंबरे विजयी झाल्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार बजरंग सोनवणे हे केज मतदारसंघातील असल्याने त्यांना सहानुभूती मिळू लागली आहे. रजनीताई पाटील , राजकिशोर मोदी, राजेसाहेब देशमुख यांचे पाठबळ आघाडीच्या पाठीशी आहे. मुंदडा व सोनवणे यांच्यातील कलह दूर झाला आहे. भाजपाला तगडे आव्हान देणारी यंत्रणा केज विधानसभा मतदारसंघात तरी कार्यरत आहे.याशिवाय आ. विनायक मेटे यांचे मूळ गाव केज विधानसभा मतदार संघात येत असल्याने याचाही राष्ट्रवादी काँग्रेसला फायदा होऊ शकतो. तसेच जयदत्त क्षीरसागरांना मानणारा मोठा वर्ग या मतदार संघात असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसची अनेक मते भाजपाच्या पारड्यात जाऊ शकतात.केज विधानसभा मतदारसंघात अंबाजोगाई हे सर्वात मोठे शहर आहे. या अंबाजोगाई शहराने मात्र, लोकसभेची पोटनिवडणूक वगळता कायम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला झुकते माप देऊन आघाडी दिलेली आहे.युती प्लस पॉर्इंट काय आहेत ?रमेश आडसकर हे भाजपासोबत असल्याने त्यांची मोठी ताकद प्रीतम मुंडे यांच्या पाठीशी उभी राहिली आहे. याशिवाय जयदत्त क्षीरसागर, महादेव जानकर यांना मानणारा मोठा वर्ग या मतदार संघात आहे.युती वीक पॉर्इंट काय आहेत ?राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तुलनेत भाजपाची प्रचारयंत्रणा तोकडी पडत आहे. तसेच आ. विनायक मेटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसशी केलेले संधान याचा बराच फटका या मतदारसंघात होऊ शकतो......आघाडी प्लस पॉर्इंट काय आहेत ?राष्ट्रवादी काँग्रेसची प्रचार यंत्रणा राबविण्यासाठी अंबाजोगाई, केज या दोन्ही नगर परिषद काँग्रेस व राष्ट्रवादीच्या ताब्यात आहेत. त्यामुळे मतदारसंघात प्रचार करणाऱ्यांची संख्या मोठी आहे.आघाडी वीक पॉर्इंट काय आहेत ?आजतागायत या मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एकही प्रचार सभा झालेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद या मतदारसंघात असली तरी राष्ट्रवादीला गटबाजीने पोखरलेले आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकbeed-pcबीडPritam Mundeप्रीतम मुंडेBJPभाजपाJaydutt Kshirsagarजयदत्त क्षीरसागरSuresh Dhasसुरेश धस