शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

"भाजपवाले मोठे कलाकार, त्यांनी शिंदें अन् अजितदादांचा काटा काढला!"; जरांगेंचा भाजपला टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2026 20:38 IST

जिल्हा परिषद निवडणुकीतही अलिप्त राहणार! जरांगे पाटलांनी पुन्हा स्पष्ट केली आपली भूमिका

परळी: मराठा आरक्षणाचे केंद्रबिंदू ठरलेले मनोज जरांगे पाटील यांनी शनिवारी परळी तालुक्यातील मिरवट येथील हरिनाम सप्ताह सोहळ्याला भेट दिली. यावेळी जरांगे पाटील यांनी राजकीय घडामोडींवर आपली रोखठोक मते मांडत भाजप आणि महायुतीवर निशाणा साधला.

माध्यमांशी बोलताना जरांगे पाटील यांनी भाजपवर तीव्र शब्दात प्रहार केला. "भाजपवाले फार मोठे कलाकार आहेत. त्यांनी आधी महाविकास आघाडी संपवली आणि आता एकनाथ शिंदेअजित पवार यांचाही काटा काढला आहे," असा खळबळजनक दावा त्यांनी केला. अजित पवार यांच्याबद्दल बोलताना ते म्हणाले की, "अजितदादांनी नासके आणि पापी लोक सोबत ठेवले, म्हणूनच मराठा समाज त्यांच्यापासून दुरावला. पुण्यासारख्या ठिकाणी त्यांना जे अपयश मिळाले, ते केवळ मराठा मतदारांच्या नाराजीमुळेच मिळाले आहे."

निवडणुकांपासून अलिप्त राहण्याचा पवित्रा कायमनुकत्याच पार पडलेल्या महानगरपालिका निवडणुकीच्या निकालांवर भाष्य करताना जरांगे पाटील यांनी सांगितले की, "मराठा समाज दुरावल्याचा थेट फटका या निवडणुकीत बसला आहे." मात्र, आपण स्वतः निवडणुकीच्या राजकारणात पडणार नाही, हे त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले. "मी विधानसभा, नगरपंचायत आणि महापालिका निवडणुकीत नव्हतो, आणि येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीतही मी अलिप्तच राहणार आहे," असे त्यांनी जाहीर केले.

एकजुटीचा मंत्र आणि कुणबी प्रमाणपत्राचा मुद्दा जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा 'मराठा-दलित-मुस्लिम' या समीकरणाचा पुनरुच्चार केला. "हे तीन समाज एकत्र आले की सगळ्यांचा धुरळा उडतो," असे ते म्हणाले. तसेच, परळी तालुक्यातील कुणबी प्रमाणपत्रांच्या तक्रारींबाबत आपण भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चा करणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. यावेळी ह.भ.प. विष्णू महाराज उखळीकर यांच्या काल्याच्या कीर्तनाला उपस्थित राहून जरांगे पाटील यांनी अध्यात्मिक ऊर्जा घेतली आणि समाजाला एकजुटीने राहण्याचे आवाहन केले.

English
हिंदी सारांश
Web Title : Jarange Patil Alleges BJP Betrayed Shinde, Pawar; Advocates Unity

Web Summary : Manoj Jarange Patil accused BJP of political manipulation, ousting allies after using them. He criticized Ajit Pawar for associating with corrupt individuals, leading to electoral setbacks. Jarange emphasized Maratha-Dalit-Muslim unity and vowed to address Kunbi certificate issues, staying away from elections.
टॅग्स :Municipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलBJPभाजपाAjit Pawarअजित पवारEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस