शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कॉँग्रेसविरोधात बीडमध्ये भाजपचे उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 00:37 IST

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : संसदेत लोकहिताचे निर्णय घेतले जात असताना कॉंग्रेस पक्ष नाहक गोंधळ आणि विरोध करून बाधा आणत आहे. काँग्रेसने संसदेत लोकशाहीची हत्या करण्याचे पाप केल्याचा आरोप करीत गुरुवारी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर खा. डॉ. प्रीतम मुंडे यांच्या नेतृत्वाखाली एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले. या वेळी जिल्ह्यातील भाजपचे आजी ...

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : संसदेत लोकहिताचे निर्णय घेतले जात असताना कॉंग्रेस पक्ष नाहक गोंधळ आणि विरोध करून बाधा आणत आहे. काँग्रेसने संसदेत लोकशाहीची हत्या करण्याचे पाप केल्याचा आरोप करीत गुरुवारी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर खा. डॉ. प्रीतम मुंडे यांच्या नेतृत्वाखाली एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले. या वेळी जिल्ह्यातील भाजपचे आजी माजी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

देशात भाजपाची सत्ता आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्व सामान्य जनतेच्या हिताचे आणि देशासाठी कल्याणकारी निर्णय घेत आहेत. मात्र नीतीभ्रष्ट काँग्रेसला हे बघवत नसल्याने संसदेत लोकहिताच्या निर्णयाला खोडा घालण्यासाठी विरोधाला विरोध करत असल्याची टीका या वेळी विविध पदाधिकाऱ्यांनी केली.

या उपोषणात आ. संगीता ठोंबरे, आर. टी. देशमुख, जि. प. अध्यक्षा सविता गोल्हार, जि. प. सभापती संतोष हंगे, सर्जेराव तांदळे, राणा डोईफोडे, मुन्ना हजारे, डॉ. लक्ष्मण जाधव, अ‍ॅड. संगीता धसे, चंद्रकांत फड, रामदास बडे, अजय सवाई यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :BeedबीडPoliticsराजकारणBJPभाजपाPritam Mundeप्रीतम मुंडेMarathwadaमराठवाडा