भाजपच्या बुथ अभियानातून संघटनशक्ती बळकट : राजेंद्र मस्के - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:35 AM2021-03-09T04:35:43+5:302021-03-09T04:35:43+5:30

बीड : सध्या राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे संघटनात्मक काम जोमाने सुरु आहे. प्रत्येक विधानसभा क्षेत्रातील बुथ रचना पुनर्गठित करून ...

BJP's booth campaign strengthens organizational strength: Rajendra Muske - A | भाजपच्या बुथ अभियानातून संघटनशक्ती बळकट : राजेंद्र मस्के - A

भाजपच्या बुथ अभियानातून संघटनशक्ती बळकट : राजेंद्र मस्के - A

Next

बीड : सध्या राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे संघटनात्मक काम जोमाने सुरु आहे. प्रत्येक विधानसभा क्षेत्रातील बुथ रचना पुनर्गठित करून एका ॲपच्या माध्यमातून ऑनलाईन करण्याचे काम प्रदेश पातळीवर सुरु आहे. याच अनुषंगाने रविवारी भारतीय जनता पक्ष बीड विधानसभा मतदारसंघाच्या ग्रामीण भागातील बुथप्रमुख, शक्तीकेंद्र प्रमुख यांची बैठक जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

यावेळी राजेंद्र मस्के म्हणाले की, बीड जिल्हा हा भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. स्व. लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी भाजप कार्यकर्त्यांच्या बळावर अनेकदा प्रस्थापितांना धूळ चारण्याचे काम केले. बीड मतदारसंघ भाजप-शिवसेना महायुतीमध्ये शिवसेनेकडे असायचा. या मतदार संघातील मतदारांचा कौल हिंदुत्व विचारसरणीकडे कायम झुकलेला आहे. म्हणूनच लोकसभा उमेदवार खासदार प्रीतम मुंडे यांना या मतदार संघातून आघाडी मिळाली आहे. आज या मतदारसंघात भाजपचा जनाधार वाढलेला आहे. आता बुथ रचनेच्या माध्यमातून प्रत्येक बुथवर भाजपचा सच्चा कार्यकर्ता प्रशिक्षित करून ३० लोकांची बुथ कमिटी सज्ज होत आहे, असे ते म्हणाले. या बैठकीला ॲड. सर्जेराव तांदळे, नवनाथ अण्णा शिराळे, चंद्रकांत फड, विजयकुमार पालसिंगकर, प्रा. देविदास नागरगोजे, सलीम जहांगीर, अजय सवाई, संध्या राजपूत, ॲड. संगीता धसे यांच्यासह बुथप्रमुख व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस सर्जेराव तांदळे म्हणाले की, बीड मतदार संघामध्ये भाजपची ताकद आणि कार्यकर्त्यांची फौज खूप मोठी आहे. अनेक निवडणुकांच्या माध्यमातून सिद्ध झाले आहे. भाजपचा हक्काचा आमदार करण्याची संधी चालून येत आहे. सर्व कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम केले तर निश्चितच राजेंद्र मस्केंच्या रूपाने आपल्या हक्काचा आमदार आपण विजयी करू शकतो.

===Photopath===

070321\4941072_bed_13_07032021_14.jpeg

===Caption===

बीड विधानसभा मतदारसंघ ग्रामीण भागातील बूथप्रमुख, शक्तीकेंद्र प्रमुख यांची बैठक जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

Web Title: BJP's booth campaign strengthens organizational strength: Rajendra Muske - A

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.