वाहनांच्या नासधूसप्रकरणी कारवाईची भाजयुमोची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:45 AM2021-06-16T04:45:44+5:302021-06-16T04:45:44+5:30

परळी : शहरातील पंचवटीनगर, तळ परिसर, टॉवर परिसर, पद्मावती गल्ली, कृष्णानगर, गणेश पार या भागात शनिवारी मध्यरात्री जवळपास पंधराच्या ...

BJP demands action in vehicle wreckage case | वाहनांच्या नासधूसप्रकरणी कारवाईची भाजयुमोची मागणी

वाहनांच्या नासधूसप्रकरणी कारवाईची भाजयुमोची मागणी

Next

परळी : शहरातील पंचवटीनगर, तळ परिसर, टॉवर परिसर, पद्मावती गल्ली, कृष्णानगर, गणेश पार या भागात शनिवारी मध्यरात्री जवळपास पंधराच्या वर चारचाकी, दोनचाकी गाड्यांची तोडफोड करून अज्ञात व्यक्तीकडून दहशत माजवण्याचा प्रयत्न करण्यात आला. वेगवेगळ्या भागात केलेली दहशत सामान्य परळीतील नागरिकांना धडकी भरवणारी घटना आहे. या नासधूसप्रकरणी कारवाईची मागणी भाजयुमोने केली आहे.

या घटनेतील आरोपींना तात्काळ अटक करून कडक कारवाई करावी, अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चा परळीच्यावतीने अंबाजोगाईचे पोलीस उपअधीक्षक सुनील जायभाये यांची सोमवारी परळीत भेट घेऊन निवेदनाद्वारे केली. यावेळी ॲड. अरुण पाठक, अश्विन मोगरकर, नितीन समशेट्टी, नरेश पिंपळे, अनिश अग्रवाल, पवन मोदानी, योगेश पांडकर, प्रल्हाद सुरवसे, गोविंद चौरे, वैजनाथ रेकने, दिलीप नेहरकर, श्रीपाद शिंदे, शाम गित्ते आदी उपस्थित होते.

अज्ञात व्यक्तीविरुद्ध परळी शहर व संभाजीनगर पोलीस ठाण्यात रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणातील आरोपींचा कसून शोध घेण्यात येत आहे, अशी माहिती परळी शहरचे सहायक पोलीस निरीक्षक गोरक्ष पालवे व संभाजीनगर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक नारायण गीते यांनी दिली .

घटनेतील आरोपी कोण?

शहरातील विविध भागात शनिवारी रात्री धुडगूस घालत कारचे नुकसान करणारे नेमके कोण आरोपी आहेत, त्यांनी असे कृत्य का केले असा प्रश्न येथील नागरिकांना पडला आहे.

===Photopath===

140621\img-20210614-wa0267.jpg

===Caption===

परळीतील वाहनांच्या नासधूस प्रकरणी आरोपीवर कारवाई करण्याची मागणी डीवायएसपी जायभाये यांच्या कडे भाजप युवा कार्यकर्त्यांनी सोमवारी केली

Web Title: BJP demands action in vehicle wreckage case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.