शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
2
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
3
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
4
मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
5
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
6
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
7
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
8
"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
9
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
10
सीक्रेट सांतानं कर्मचाऱ्याला दिलेलं गिफ्ट पाहून तरुणी भलत्याच खूश झाल्या, असं काय मिळालं?
11
"कांगारूंना कसं हरवायचं? ते शास्त्र फक्त शास्त्रींकडेच! इंग्लंडने त्यांनाच कोच करावं"
12
Travel : जगातील एक 'असे' ठिकाण, जिथे वेळेचे कोणतेच बंधन नाही! घड्याळ तर कुणी वापरतच नाही
13
Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
14
'खेलरत्न'साठी हार्दिक! दिव्या देशमुखसह २४ खेळाडू अर्जुन पुरस्कारासाठी नामांकित; इथं पाहा संपूर्ण यादी
15
ज्यांनी घेतलीय त्यांनी मागच्या सीटवर बसू नका, या देशाने घातली मारुती सुझुकीच्या Fronx विक्रीवर बंदी...
16
Astrology: २०२६ आधी 'या' ३ गोष्टी केल्याने होईल मोठा लाभ; ज्योतिषांनी दिला नवीन वर्षाचा कानमंत्र!
17
"युतीमुळे तुम्हाला फरक पडत नाही, तर तोंडाची डबडी का वाजवताय?", संजय राऊत भाजपा नेत्यांवर भडकले
18
१७ वर्षानंतर तारिक रहमान बांगलादेशात परतले; राजकीय हालचालींना वेग, भारतासाठी फायद्याचे की तोट्याचे
19
"कोणालाच सत्य माहित नव्हतं...", ९ वर्षांनंतर शिल्पा शिंदेने 'भाबीजी घर पर हैं' सोडण्यामागचं सांगितलं कारण
20
जीएसटी कमी होऊन, दोन महिनेही झाले नाहीत तोच कारच्या किंमती महागणार; मारुतीपासून महिंद्रापर्यंत सर्वच कंपन्या वाढवणार किमती
Daily Top 2Weekly Top 5

बीडमध्ये तगडा पोलीस बंदोबस्त; ड्रोनद्वारे राहणार नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2019 00:20 IST

लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणी दरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, मतमोजणी शांततेत पार पाडण्यासाठी बीड जिल्हा पोलीस दलाने तगडा बंदोबस्त लावला आहे.

ठळक मुद्देचार टप्पे : ५०० मीटरपर्यंत येण्यास बंदी, सीआरपीएफ, आरसीपीएफच्या विशेष तुकड्या केल्या तैनात

सोमनाथ खताळ।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणी दरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, मतमोजणी शांततेत पार पाडण्यासाठी बीड जिल्हा पोलीस दलाने तगडा बंदोबस्त लावला आहे. सीआरपीएफ, आरसीपीसारख्या विशेष तुकड्या प्रत्येक ठिकाणी तैनात केल्या आहेत. तसेच या परिसरात ड्रोन कॅमेऱ्याद्वारे उपद्रवींवर नजर ठेवली जाणार आहे.पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, अजित बोºहाडे यांनी सोमवारीच सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सूचना केल्या. त्यानंतर मंगळवारी दुपारी बंदोबस्ताची तालीम करण्यात आली. यावेळी नियूक्त केलेल्या अधिकारी, कर्मचाºयांना जी.श्रीधर यांनी सूचना केल्या.तसेच अचानक काही परिस्थिती उद्भवली तर घ्यावयाच्या काळजीबाबत मार्गदर्शन केले.दरम्यान, हा बंदोबस्त चार टप्प्यात असणार आहे. तीन टप्प्यांपर्यंत केवळ माध्यम प्रतिनिधीला मोबाईलसाठी परवानगी असेल. चौथ्या टप्यात विशेष बंदोबस्त असेल. तसेच राजकीय पक्षांच्या कार्यालयासमोर आणि उमेदवारांच्या घराजवळही पोलीस बंदोबस्त असणार आहे. केंद्र परिसरात विजय कबाडे तर बाहेर अजित बोºहाडे बंदोबस्त पाहतील.दरम्यान, गोंधळ घालणाºया कार्यकर्त्यांना तात्काळ ताब्यात घेतले जाणार आहे. कोणी खोट्या अफवा पसरवल्या तर त्यांच्यावरही कारवाई केली जाणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.बीड शहरासह गावागावांत बंदोबस्तकायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी संपूर्ण जिल्ह्यात पोलिसांचे फिक्स पॉईंट राहणार आहेत. १६० संवेदनशिल गावांमध्ये पोलीस लक्ष ठेवून राहणार आहेत. तसेच साध्या कपड्यातील पोलीसही गोपनीय माहिती घेणार असल्याचे अधीक्षक जी.श्रीधर म्हणाले.

टॅग्स :BeedबीडLok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालbeed-pcबीडPoliceपोलिस