शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
2
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
3
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
4
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
5
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
6
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
7
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
8
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
9
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
10
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
11
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
12
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
13
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
14
दररोज अंगाला साबण लावत असाल तर आताच बदला सवय; कधी, किती वेळा करायचा वापर?
15
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 
16
एका घरात दोनच 'लाडक्या बहिणी', इतरांचा होणार पत्ता कट; सरकारच्या नियमानं महिला धास्तावल्या
17
सॅमसंग गॅलेक्सी एस २४ अल्ट्रा ५० हजारांनी स्वस्त, कॅमेरा क्वालिटीत कुठलंही कॉम्प्रमाइज नाही!
18
मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीचा लग्नानंतर ६ महिन्यातच मृत्यू; प्रकरणात आला नवा ट्विस्ट
19
रक्षाबंधन सणासाठी जाताना अपघात; आई-वडीलांच्या डोळ्यांदेखत चिमुकल्याचा मृत्यू, गडचिरोलीतील घटना
20
PIB Fact Check: रजिस्टर्ड पोस्ट सेवा बंद करण्यात आलीये का? पाहा व्हायरल दाव्यामागील सत्य

मोठी बातमी! संतोष देशमुख प्रकरणात न्यायालयीन समितीची स्थापना

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2025 22:07 IST

Santosh Deshmukh Case : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास सेवानिवृत्त न्यायमूर्ती एम एल ताहलियानी यांच्या नेतृत्वाखाली एक समिती स्थापन करण्यात आली आहे.

Santosh Deshmukh Case ( Marathi News ) : बीड जिल्ह्यातील मस्साजोग या गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा तपास सुरू आहे. आता या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी न्यायालयीन समिती गठीत करण्यात आली आहे. सेवानिवृत्त न्यायाधीश एम.एल.ताहलियानी ही एत सदस्यीय समिती या प्रकरणाची चौकशी करणार आहे. ताहलियानी यांनी या आधी दहशतवादी कसाब खटल्यातील न्यायाधीश म्हणून काम केले आहे. 

तसेच सेवानिवृत्त न्यायमूर्ती एम एल ताहलियानी परभणी हिंसाचारावेळी कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणाचाही तपास करणार आहेत. या दोन्ही समित्या पुढील सहा महिन्यात अहवाल देणार आहेत. 

हिवाळी अधिवेशनात या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी चौकशीसह न्यायालयीन चौकशी करणार असल्याचेही सांगितले होते. दरम्यान, आता न्यायालयीन चौकशीसाठी समिती गठीत करण्यात आली आहे. या चौकशी समितीचे मुख्यालय हे बीड मध्ये असणार आहे, या प्रकरणी चौकशी समितीला कोणाचीही चौकशी करण्याचा अधिकार असणार आहे. 

ताहलियानी यांनी मुंबई २६/११ बॉम्ब हल्ल्याच्या खटल्यात न्यायमूर्ती म्हणून काम पाहिले आहे, तसेच प्रसिद्ध दिवंगत गायक आणि संगीतकार गुलशन कुमार यांच्या हत्येच्या खटल्यावेळीदेखील न्यायाधीश म्हणून होते. तहलियानी हे निवृत्त झाले आहेत, पण राज्य सरकारने त्यांच्यावर संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासाची जबाबदारी दिली आहे.

एसआयटीने कोर्टात मोठे दावे केले

पवनचक्की कंपनीला मागितलेल्या दोन कोटींच्या लाच प्रकरणात संशयीत आरोपी वाल्मीक कराड याच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. काल कराड याच्याविरोधात मकोका गुन्हा दाखल केला, आता एसआयटीने कराड याचा सरपंच देशमुख यांच्या हत्येप्रकरणाचा तपास करण्यासाठी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, आज एसआयटीने वाल्मीक कराड याला कोर्टासमोर आणले. यावेळी एसआयटीने वाल्मीक कराड याच्याबाबत सात मोठे दावे केले आहेत. यामुळे आता कराड याच्या अडचणी आणखी वाढू शकतात. 

वाल्मीक कराड याला आज एसआयटीने कोर्टात हजर केले.  यावेळी एसआयटीने कोर्टाला महत्वाची माहिती दिली, खंडणी प्रकरण आणि हत्याप्रकरणाची इंटरलिंक असल्याचे सांगितले. ही हत्या खंडणी प्रकरणामुळेच झाल्याचा दावा एसआयटीने न्यायालयात केला. पवनचक्की कंपनी अवादाकडून खंडणी मागण्यात अडथळा ठरल्या प्रकरणी ही हत्या केल्याचा दावा एसआयटीने केला. 

टॅग्स :beed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरणPoliceपोलिसCourtन्यायालय