बीड आरटीओ कार्यालयात शुकशुकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 01:14 AM2018-05-15T01:14:29+5:302018-05-15T01:14:29+5:30

मागील काही महिन्यांंपासून प्रभारी अधिकारी व कर्मचा-यांवर अवलंबून असणा-या या कार्यालयात सोमवारी फक्त एक वाहन निरिक्षक अमोल अव्हाड,एक वरिष्ठ लिपिक नामदेव अखाडे, लिपिक शिंंदे व एक महिला रोखपाल हेच हजर होते. त्यामुळे एकंदरीत सर्व कामकाज ठप्प होते. बाकी सर्व जण सुटीवर असल्याचे सांगण्यात आले.

Bid RTO office suspicion | बीड आरटीओ कार्यालयात शुकशुकाट

बीड आरटीओ कार्यालयात शुकशुकाट

googlenewsNext
ठळक मुद्देचौघेच होते कामावर; अधिकाऱ्यांच्या अभावाने कामकाज ढेपाळले

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : मागील काही महिन्यांंपासून प्रभारी अधिकारी व कर्मचा-यांवर अवलंबून असणा-या या कार्यालयात सोमवारी फक्त एक वाहन निरिक्षक अमोल अव्हाड,एक वरिष्ठ लिपिक नामदेव अखाडे, लिपिक शिंंदे व एक महिला रोखपाल हेच हजर होते. त्यामुळे एकंदरीत सर्व कामकाज ठप्प होते. बाकी सर्व जण सुटीवर असल्याचे सांगण्यात आले.

उप प्रादेशिक परिवहन कार्यालय बीड येथे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून जालना कार्यालयाचे सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी सलीम शेख हे कार्यरत आहेत.पंरतु त्यांची सेवानिवृत्त ही येत्या ३१ मे दरम्यान असल्याचे कळते. त्यामुळे ते बीड कार्यालयात येत नाहीत .

कार्यालयात एकूण ४३ पदे असून त्यापैकी ३२ पद रिक्त आहेत. कार्यरत पदांपैकी बरेच अधिकारी व कर्मचारी हे प्रभारी आहेत. शासकीय पातळीवर या बाबत अनेकवेळा निवेदन दिले आहेत. परंतु प्रशासकीय यंत्रणा या बाबतीत दुर्लक्ष करत आहे. याचा त्रास वाहन मालक व चालकांना सहन करावा लागत आहे. बीड जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीदेखील परिवहन विभागाच्या कारभाराबाबत थकले आहेत. सदरचे कार्यालय असुन अडचण नसून खोळंबा झालेले आहे. दरम्यान बीड कार्यालयातील ठप्प कामकाजाची चौकशी व दोषींवर कारवाई करण्याची मागणी भारिप बहुजन पक्षाचे नेते अ‍ॅड. बक्शू अमीर शेख यांनी केली आहे.

वाहन हस्तांतरण थांबले
मागील २० दिवसात एकही वाहन हस्तांतरित झालेले नाही. ज्याकडे ही जबाबदारी आहे तो कर्मचारी सतत गैरहजर असल्याने कामे खोळंबली आहेत. बीड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात अधिकाºयांच्या अभावामुळे कामकाज ढेपाळलेले असताना उपलब्ध दोन वाहन निरिक्षकांपैकी एकास राज्य तपासणी नाक्यावर पाठविले जाते.

Web Title: Bid RTO office suspicion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.