शहरं
Join us  
Trending Stories
1
'दक्षिणेतील लोक आफ्रिकन दिसतात'; सॅम पित्रोदांच्या विधानावर काँग्रेस म्हणतं, 'त्यांनी दिलेली उपमा...'
2
ठरले! पंतप्रधान मोदी अन् राज ठाकरेंची जाहीर सभा होणार; मनसे नेत्यांनी दिली माहिती
3
आंबेगावमध्ये अजित पवारांना जुन्या पॅटर्नची भीती?; जाहीर सभेतच जनतेला केलं आवाहन
4
काँग्रेस म्हणजे 'नफरत की दुकान', सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर BJP आक्रमक; निलंबनाची मागणी
5
"काँग्रेस मजबूत झाली तर देश मजबूत होईल", शरद पवारांच्या 'त्या' विधानावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया
6
दोस्त दोस्त ना रहा! मोदींचं अदानी-अंबानींबद्दल विधान अन् खरगेंनी सांगितला निकालाचा ट्रेंड
7
₹7 च्या शेअरची कमाल, 4 महिन्यांपासून गुंतवणूकदारांना करतोय मालामाल! खरेदीसाठी लोकांची झुंबड
8
Storage Technologies and Automation : पहिल्याच दिवशी शेअरची किंमत दुप्पट; ₹७८ चा 'हा' स्टॉक पोहोचला ₹१५५ पार
9
भर चौकात महिलेने घातला गोंधळ, रस्त्यावरच उरवायला लागली कपडे, पोलिसांशी घातला वाद. अखेर...  
10
४ जूनच्या निकालानंतर सगळं स्पष्ट होईल; शरद पवारांच्या विधानावर पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
11
सॅम पित्रोदांनी ईशान्य आणि दक्षिण भारतातील लोकांच्या रंगावरून केलेल्या टिप्पणीला मोदींचं प्रत्युत्तर, म्हणाले...   
12
गुगल वॉलेटची भारतात एंट्री! जाणून घ्या 'Google Pay'पेक्षा किती वेगळी असेल
13
Shakib Al Hasan ने सेल्फीसाठी आलेल्या चाहत्याची मान धरली, मारण्यासाठी हात वर केला, Video Viral 
14
उत्तर मुंबईतील सर्वसमावेशक विकासावर लक्ष केंद्रीत करणार; पीयूष गोयल यांनी दिली ग्वाही
15
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर; ४ जागांसाठी 'या' तारखेला मतदान
16
परशुराम जन्मोत्सव: विष्णूंचा सहावा अवतार, शस्त्र-शास्त्रात पारंगत चिरंजीव; वाचा, महात्म्य
17
अरे देवा! ब्युटी पार्लरमध्ये भेटल्या, एकमेकींच्या प्रेमात पडल्या अन् घरातून पळाल्या; कोर्ट म्हणतं...
18
टोल नाकेवाल्यांनी पैसे घेतले, NHAI ला महागात पडले; परदेशी वाहनमालक नडला, 25000 चा दंड
19
30 वर्ष सहन केला नवऱ्याचा अत्याचार; बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्रीचे लग्नानंतर झाले अतोनात हाल
20
Smriti Irani Tax Saving Funds : स्मृती इराणींनी ज्या टॅक्स सेव्हिंग फंडात गुंतवणूक केली, माहितीये त्यांची कामगिरी कशीये?

बर्ड फ्ल्यूमुळे खबरदारी; आष्टी तालुक्यात पशुसंवर्धनची सात पथके तैनात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 1:35 PM

आष्टी तालुक्यात 19 व्या पशुगणणेनुसार 3 लाख  66 हजार  581 एवढी कोंबड्यांची संख्या आहे.

ठळक मुद्देपक्षी अथवा कोंबड्या मृत होताच पथकाला कळवण्याचे प्रशासनाचे आवाहन 

कडा ( बीड ) : आठ दिवसांपूर्वी तालुक्यात बर्ड फ्लूमुळे कावळ्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. यानंतर तालुक्यातील ब्रम्हगांव व  शिरापुर येथे देखील शेकडो कोबड्या दगावल्याची घटना उघडकीस आली आहे. यामुळे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आष्टी तालुक्यातील साडेतीन लाख कोंबड्याच्या सुरक्षेसाठी पशुसंर्वधन विभागाने सात पथके तैनात केली आहेत. तालुक्यात पक्षी अथवा कोंबड्यांचा मृत्यू झाला तर याची माहिती कळविण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. 

आष्टी तालुक्यात 19 व्या पशु गणणेनुसार   3 लाख  66 हजार  581 एवढी कोंबड्याची नोंद आहे. सुशिक्षित बेरोजगार तरूण मोठ्या प्रमाणावर कुक्कुटपालन व्यवसायाकडे वळले आहेत. लाखो रुपयांची गुतवणुक करून उभा केलेल्या या व्यवसायाला आता कठिण दिवस आलेत. आठ दिवसापासुन शेजारील तालुक्यात बर्ड फ्ल्यूची लागण झाल्याने कावळ्याचा मृत्यू झाला. त्याचबरोबर तालुक्यातील ब्रम्हगांव येथेही एक पक्षी मृत आढळून आल्याने प्रशासनाने गंभीर दखल घेत बारा गावे कंटेनमेन्ट झोन घोषित केले. याच धर्तीवर अशा घटना कुठे घडल्या की लगेच पाहणी व निदानासाठी पंचनामा करून पुणे प्रयोगशाळेत पाठवण्यासाठी पशुसंर्वधन विभागाने सात पथके तयार केली आहेत. प्रत्येक पथकात एक पशुधन विकास अधिकारी, तीन सहाय्यक परिचर आहेत. पक्षी अथवा कोंबड्या मृत अवस्थेत आढळून आल्यास घाबरून न जाता पशुसंर्वधन विभागाला कळवावे असे आवाहन तालुका पशुधन विकास अधिकारी डॉ. मंगेश ढेरे यांनी केले आहे.  

टॅग्स :BeedबीडBird Fluबर्ड फ्लू