शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

बीईओ करणार आरटीई प्रवेशपात्र शाळांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2020 15:05 IST

निकषपात्र शाळाच ऑनलाईनवर दिसणार

ठळक मुद्देनोंदणी झालेल्या पात्र शाळांचे व्हेरिफिकेशन गटशिक्षणाधिकारी पातळीवर होणार

- अनिल भंडारी  

बीड :  आरटीई प्रवेशपात्र सन २०१९-२० च्या अ‍ॅटोफॉरवर्ड केलेल्या शाळेची व नवीन शाळांची नोंदणी गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या स्तरावरून पडताळणी केली जाणार आहे. त्यामुळे निकषपात्र शाळाच आता आॅनलाईन पोर्टलवर दिसणार आहेत. 

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमानुसार खाजगी विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित स्वयंअर्थ सहाय्यित शाळांमध्ये एकूण प्रवेशाच्या २५  टक्के जागा वंचित व दुर्बल घटकांतील मुलां-मुलींसाठी राखीव ठेवण्याची तरतूद आहे. यासाठी तीनऐवजी एकाच टप्प्यात लॉटरी काढली जाणार आहे. २०२०-२१ वर्षासाठी आॅनलाईन प्रवेश  प्रक्रियेतील पहिल्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. शाळांमधील रिक्त पदांची व नियम अनुपालनाची पडताळणी आता गटशिक्षणाधिकारी पातळीवरील समिती करणार आहे. संबंधित शाळांची पटसंख्या आॅनलाईन सरल पोर्टलवर दिसणार आहे. मागील ३ वर्षांची प्रवेश वर्गाची पटसंख्या लक्षात घेऊन आरटीईची रिक्त पदे ही समिती निश्चित करणार आहे. बीईओंकडून पडताळणी झाल्यानंतर पात्र शाळांना त्यांच्या लॉगिनवर रिक्त जागा कळणार आहेत. 

शाळांचे बिंग फुटणारतालुक्यातील एखादी शाळा बंद असेल किंवा एखाद्या शाळेला मागील तीन वर्षांपासून विद्यार्थी संख्या नियमाप्रमाणे प्राप्त नसेल अशा शाळा आरटीई प्रवेशासाठी बंद करण्याबाबत गटशिक्षणाधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत. प्रवेशपात्र इंग्रजी शाळांची पडताळणी बीईओ स्तरावरच होणार  आहे.

आरटीई प्रवेश प्रक्रियेबाबत प्राथमिक शिक्षण संचालनालयाच्या  निर्देशानुसार नोंदणी झालेल्या पात्र शाळांचे व्हेरिफिकेशन गटशिक्षणाधिकारी पातळीवर होणार आहे. यासाठी २१ जानेवारी ते ६ फेब्रुवारी असा कालावधी आहे. - गौतम चोपडे,   समन्वयक आरटीई तथा प्रभारी गटशिक्षणाधिकारी, बीड

टॅग्स :SchoolशाळाEducationशिक्षणState Governmentराज्य सरकारRight To Educationशिक्षण हक्क कायदा