शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जातेगाव फाट्यावर रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 00:19 IST

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने मंगळवारी सकाळी ११.३० वाजता जातेगाव फाट्यावर एक तास रास्ता रोको आंदोलन केले.

ठळक मुद्देएक तास आंदोलन : जातेगाव, तलवाडा मंडळांत शेतकऱ्यांना नाकारला पीकविमा

गेवराई : तालुक्यातील जातेगाव व तलवाडा महसूल मंडळातील शेतकऱ्यांना सोयाबीनचा विमा नाकारला आहे. विमा कंपनीने भर दुष्काळात नुकसान झालेल्या शेतकºयांचा विमा नाकारुन शेतक-यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे. हा विमा त्वरित मंजूर करून वाटप करावा, या मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने मंगळवारी सकाळी ११.३० वाजता जातेगाव फाट्यावर एक तास रास्ता रोको आंदोलन केले. या भागातील अनेक शेतकरी यात सहभागी होते. आंदोलनामुळे दुतर्फा गाड्यांची वाहतूक ठप्प झाली होती.तालुक्यातील तलवाडा व जातेगाव महसूल मंडळातील शेतक-यांनी गतवर्षी मोठ्या प्रमाणात सोयाबीनचा पेरा केला होता. मात्र पावसाने हुलकावणी दिल्याने शेतक-यांचे नुकसान झाले. परंतु एवढा दुष्काळ असून, देखील विमा कंपनीने तलवाडा व जातेगाव परिसरातील शेतकºयांचा सोयाबीनचा विमा नामंजूर केला आहे. त्यामुळे शेतकºयांवर दुहेरी संकट कोसळले आहे.या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवती प्रदेशाध्यक्ष पूजा मोरे यांच्या नेतृत्वालाखाली दोन्ही महसूल मंडळातील सोयाबीन उत्पादकांना तात्काळ विमा रक्कम मंजूर करु न वाटप करावी, या मागणीसाठी मंगळवारी सकाळी ११.३० वाजता राष्ट्रीय महामार्ग कल्याण -विशाखापट्टणम मार्गावरील जातेगाव फाटा येथे रास्ता रोको करण्यात आले.यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मराठवाडा कार्याध्यक्ष गजानन बंगाळे, माणिक कदम, निवृत्त शेवाळे, अशोक मुटकुळे, वचिष्ठ बेडके, काशिनाथ चिकणे, सतीश मस्के, लिंबाजी पवार, कैलास पवार, श्ेख मुसा सह अनेक शेतकरी उपस्थित होते. रास्ता रोकोचे निवेदन तालुका कृषी अधिकारी संजय ढाकणे यांना देण्यात आले. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

टॅग्स :BeedबीडSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाCrop Insuranceपीक विमाagitationआंदोलन