शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

बीड जि.प.चे अनफिट कर्मचारी जाणार घरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 10:37 IST

बीड जिल्हा परिषदेतील वर्ग- ३ आणि वर्ग -४ कर्मचाऱ्यांची क्षमतावृद्धी तपासणीचे आदेश जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी दिले आहेत. यानुसार अनफिट ठरणारे कर्मचारी घरी जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जिल्हा परिषदेतील वर्ग- ३ आणि वर्ग -४ कर्मचाऱ्यांची क्षमतावृद्धी तपासणीचे आदेश जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी दिले आहेत. यानुसार अनफिट ठरणारे कर्मचारी घरी जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पदभार स्विकारल्यानंतर अमोल येडगे यांनी शिक्षण विभागातील स्वच्छता मोहीम सुरु केली होती. कक्ष अधिकाºयाची बदली करुन धमाका केला होता. त्यानंतर हंगामी वसतिगृहांची तपासणीची महत्वाची मोहीम राबवून सरकारी निधीचा गैरवापर करणा-यांना धक्का दिला.

इतर विभागातील प्रशसकीय कार्यवाहीला वेग आणण्याचा प्रयत्न केलेला असतानाच आता शिक्षण विभागातील ५५ वर्षांवरील तसेच ३० वर्ष सेवा पूर्ण केलेल्या जि. प. कर्मचाºयांच्या कामाचा आढावा तसेच गोपनीय अहवालाची तपासणी करण्याबाबत आदेशित केले आहे.

या कर्मचा-यांची सेवेत राहण्याची पात्रता आजमाविण्याच्या संबंधात पुनर्विलोकन करण्यात येत आहे. या अंतर्गत कर्मचाºयाची शारीरिक क्षमता, सचोटी आदींची माहिती घेतली जात आहे.जिल्ह्यातील ११ गटशिक्षणाधिकारी तसेच जि. प. माध्यमिक शाळांच्या वर्ग २ च्या मुख्याध्यापकांना या संदर्भात माहिती संकलित करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत.

या मोहिमेंतर्गत वर्ग- ३ आणि वर्ग -४ च्या कर्मचाºयांच्या कामकाजाचा आढावा घेवून तसेच त्यांचे गोपनीय अहवाल तपासून यापुढे ते शासकीय सेवा बजावण्यास सक्षम आहेत की नाहीत याबाबतचा अहवाल मुख्य कार्यकारी अधिका-यांपुढे सादर होणार आहे.सर्व शिक्षक संवर्गातील प्राथमिक शिक्षक, प्राथमिक पदवीधर, केंद्र प्रमुख, ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी, वर्ग ३ चे मुख्याध्यापक, शारीरिक, चित्रकला, प्रयोगशाळा सहायक, माध्यमिक शिक्षकांची माहिती घेतली जाणार आहे. तसेच शासन पातळीवर देखील वर्ग एक आणि वर्ग दोनच्या अधिकाºयांचीही तपासणी होणार असल्याचे वृत्त आहे.

अनेक कर्मचारी ताळ्यावर येणारप्रशासकीय पातळीवर कामकाजाला गती आणण्यासाठी क्षमता तपासणी मोहीम हा कार्यालयीन कामकाजाचा भाग आहे. अनेक कर्मचारी त्यांना नेमून दिलेल्या ठिकाणी गैरहजर राहतात, कार्यालयीन व शालेय पातळीवर कामचुकारपणा तसेच गैरवर्तन करताना आढळून येतात. काही कर्मचारी नेमून दिलेल्या कामकाजात हलगर्जीपणा करतात. वरिष्ठांच्या सूचनांचे अनुपालन टाळतात असे कर्मचारी या मोहिमुळे ताळ्यावर येणार आहेत.

टॅग्स :Beedबीडzpजिल्हा परिषदMarathwadaमराठवाडाEmployeeकर्मचारी