शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

बीड जि.प. अध्यक्षपदाची उद्या निवडणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2020 00:24 IST

येथील जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपद व उपाध्यक्ष पदाची निवडणूक ४ जानवारी रोजी होत असून जिल्हा परिषदेची सत्ता पुन्हा राखण्यासाठी भाजपने ताकद लावली असलीतरी राज्यातील सत्ताबदलामुळे राष्टÑवादी कॉँग्रेसनेही हालचाली सुरु केल्या आहेत.

ठळक मुद्देनिवडीत चुरस : भाजप, राष्टÑवादीची मोर्चेबांधणी, शिवसेना सदस्यांचा राहणार प्रभाव

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : येथील जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपद व उपाध्यक्ष पदाची निवडणूक ४ जानवारी रोजी होत असून जिल्हा परिषदेची सत्ता पुन्हा राखण्यासाठी भाजपने ताकद लावली असलीतरी राज्यातील सत्ताबदलामुळे राष्टÑवादी कॉँग्रेसनेही हालचाली सुरु केल्या आहेत. तर शिवसेनेकडे चार सदस्य असल्याने जिल्हा परिषद अध्यक्ष पदाच्या निवडणूकीत या सदस्यांचा प्रभाव राहणार आहे. हे सदस्य जिकडे वळतील त्या पक्षाचा, गटाचा अध्यक्ष होणार आहे.विधानसभा निवडणूकीत भाजपचा चार मतदार संघात पराभव झाल्याने बीड जिल्हा परिषदेत भाजपला सत्ता कायम ठेवायची आहे. मात्र यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. मागील अडीच वर्षाच्या कार्यकाळात उपाध्यक्षपद चार सदस्य असलेल्या शिवसंग्रामकडे होते. नंतर जयश्री राजेंद्र मस्के व अन्य तीन सदस्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. तर शिवसेनेचे चार सदस्य असताना सभापतिपदावरच थांबावे लागले होते.त्यामुळे यंदा शिवसेना ठोस भूमिका घेण्याची शक्यता आहे. अध्यक्षपदासाठी अद्याप अधिकृत नावे जाहीर झाली नसलीतरी भाजप व राष्टÑवादी काँग्रेसने मोर्चेबांधणी केली आहे.५३ सदस्यांमधून होणार निवडणूकजिल्हा परिषदेतील ६० पैकी पाच सदस्यांचे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. विधानसभा निवडणूकीत विजयी झालेले संदीप क्षीरसागर आणि बाळासाहेब आजबे यांच्या राजीनाम्यामुळे राष्टÑवादी कॉँग्रेसकडील दोन सदस्य कमी झाले आहेत. त्यामुळे ५३ सदस्यांतून निवडणूक होईलआता राष्टÑवादी कॉँग्रेसचे १९, कॉँग्रेस ३, भाजपा १९, शिवसंग्रामचे ४, शिवसेनेचे ४, काकू - नाना आघाडीचे २, अपक्ष २ असे बलाबल आहे. शिवसंग्रामचे चारही सदस्य सध्या भाजपवासी झाले आहेत.मागील निवडीत शिवसेनेने भाजपला मदत केली होती. आता सत्ताबदलामुळे या सदस्यांची भूमिका राज्याच्या समिकरणाकडे की, जिल्ह्याच्या समिकरणाकडे राहील हे पहायला मिळणार आहे.

टॅग्स :Beedबीडzpजिल्हा परिषदElectionनिवडणूकBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस