शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

Beed: संतोष देशमुख हत्येचे फोटो पाहून तरुणाचा टोकाचा निर्णय; आंदोलनानंतर स्वतःला संपवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2025 17:23 IST

संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे युवकाने घेतले टोकाचे पाऊल

बीड : जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो समोर आल्यानंतर एक धक्कादायक घटना घडली आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येच्या फोटोमुळे संतप्त होऊन केजमध्ये बंद पुकारण्यात आला होता, ज्यामध्ये अशोक शिंदे या २३ वर्षीय तरुणाने सहभाग घेतला होता. मात्र, घरी परतल्यानंतर त्याने टोकाचा निर्णय घेऊन गळफास घेऊन जीवन संपवले. आत्महत्येपूर्वी त्याने आपल्या बहिणीला फोन करून "मला टोकाचे पाऊल उचलावेसे वाटत आहे," असे सांगितले. बहिणीने त्याला समजवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यानंतर त्याने फोन बंद केला आणि स्वतःला संपवल्याची माहिती आहे.

संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या आरोपपत्राचा भाग आहेत. त्यानंतर हे फोटो सोशल मिडियात व्हायरल झाले. याचे तीव्र पडसाद उमटून बीड जिल्ह्यात बंद पाळून आरोपींना फाशीची देण्याची मागणी आंदोलकांनी केली. केज तालुक्यातील जाणेगाव येथील अशोक हरिभाऊ शिंदे (२३) हा तरुण देखील केज येथील आंदोलनात सहभागी झाला होता. मात्र, संतोष देशमुख यांची हत्या आणि त्याचे फोटो पाहून अशोक अस्वस्थ होता. त्याने आंदोलनावरून घरी येऊन पुण्यात राहणाऱ्या आपल्या बहिणीला, अश्विनी माने हिला फोन करून आपली भावना व्यक्त केली. "मला टोकाचे पाऊल उचलावेसे वाटत आहे," असे सांगून त्यांनी आपल्या मनातील अस्वस्थता मांडली. बहिणीने त्याला समजवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यानंतर त्याने फोन बंद केला आणि गळफास लावून आत्महत्या केली.

बहिणीने समजावले पण...या घटनेमुळे अशोक शिंदे याचे कुटुंबिय मोठ्या धक्क्यात आहेत. त्याचे बंधू शिवराज शिंदे यांनी सांगितले की, "अशोकचा मला कॉल आला होता, पण कामात असल्यामुळे मी तो उचलू शकलो नाही. काही वेळाने दुसरा कॉल आला, त्यावेळी समजले की त्याने गळफास घेतला आहे." त्याची बहीण अश्विनी माने म्हणाली, "तो फोनवर रडत होता. मी त्याला समजावले, पण त्याने फोन बंद केला." त्यांचे वडील हरिभाऊ शिंदे म्हणाले, "मी शेतात होतो आणि मोबाईल बंद होता, त्यामुळे त्याच्याशी संपर्क होऊ शकला नाही."

धनंजय देशमुख यांचे सांत्वनया घटनेनंतर संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी अशोक शिंदे यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. त्यांनी सांगितले की, "अशोक भावनिक आवेशात टोकाचा निर्णय घेतला. कोणीही असे पाऊल उचलू नये. दोषींना शिक्षा होईपर्यंत आपण एकत्र राहायला हवे."

टॅग्स :Santosh Deshmukhसंतोष देशमुख हत्या प्रकरणbeed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरणBeedबीडagitationआंदोलनDeathमृत्यू