शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

Beed: चालकाचा ताबा सुटल्याने कार डिव्हायडरवर आदळून दुसऱ्या बाजूच्या जीपवर धडकली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 13:47 IST

लाखमापूर पाटीजवळ कार डिव्हायडरवर आदळून जीपवर आदळली; लातूरचे तिघे ठार, ८ जखमी!

अंबाजोगाई : अंबाजोगाई ते लातूर राष्ट्रीय महामार्गावर सोमवारी रात्री दहाच्या सुमारास लाखमापूर पाटीजवळ कार आणि जीप यांच्यात झालेल्या भीषण अपघातात लातूरचे तीनजण जागीच ठार झाले, तर आठजण जखमी झाले आहेत. अपघातातील जखमींना उपचारासाठी तातडीने लातूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सोमवारी रात्री भरधाव वेगाने लातूरकडून येणारी कार (क्र. एमएच १२ सीवाय ७०२२) अंबाजोगाईकडे येत होती. यावेळी कारचालकाचे नियंत्रण सुटल्याने ती कार डिव्हायडरवर आदळून दुसऱ्या बाजूने लातूरकडे जात असलेल्या जीपवर (क्र. एमएच २४ सीवाय ४७७१) आदळली. या दुर्घटनेत कारमधील तीनजण जागीच ठार झाले. मृत व्यक्तींमध्ये अमित सुभाष राऊत (वय ३५, रा. आर्वी, लातूर), पृथ्वी रमाकांत जाधव (३०, रा. खानापूर, ता. रेणापूर) आणि नजीमोद्दीन फैजोद्दीन शेख (३७, रा. आर्वी, जि. लातूर) यांचा समावेश आहे. या घटनेत एकूण आठजण जखमी झाले आहेत. जीपमध्ये असलेले वीरभद्र उमाकांत स्वामी (वय ४०), सरस्वती वीरभद्र स्वामी (३२), महेश रमाकांत स्वामी (३१), अश्विनी गंगासागर स्वामी (२८), गणेश रमाकांत स्वामी (२५), प्राची गंगासागर स्वामी (७) (सर्व रा. आरजखेडा, ता. रेणापूर, जि. लातूर) हे सर्वजण जखमी झाले. तसेच, दिशान इस्माईल सय्यद (वय २०, रा. काळे गल्ली, लातूर) आणि अरबाज रहमत शेख (२१, रा. रेणुका नगर, लातूर) यांचाही जखमींमध्ये समावेश आहे.

सात वर्षांची प्राची गंभीर जखमीबर्दापूरचे सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर कांबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमींपैकी प्राची स्वामी हिला गंभीर दुखापत झाली आहे. या सर्व जखमींना लातूरच्या रुग्णालयात पाठवले असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात पाठविले होते. अपघाताची माहिती मिळताच बर्दापूर पोलिस व स्थानिक नागरिक घटनास्थळी मदतीसाठी धावले. कारमधील मृत बाहेर काढून गंभीर जखमींना लातूरच्या रुग्णालयात पाठविण्यात आले. या घटनेचा बर्दापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Beed: Car crash on divider kills three, injures eight.

Web Summary : Near Ambajogai, a car jumped a divider and collided with a jeep, killing three from Latur and injuring eight. The injured were rushed to a Latur hospital. Police are investigating.
टॅग्स :NandedनांदेडAccidentअपघात