शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

Beed: भोगलवाडी फाट्यावर बॅनर फाडल्याने तणाव; सहाजणांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2025 19:50 IST

दोन समाजांत तेढ निर्माण होण्याचा प्रसंग ओढावत असताना दिंद्रुड पोलिसांनी दोन्ही समाज बांधवांना समजून सांगत दोषींवर कारवाई केली जाईल, असे सांगितले.

धारूर : गावाजवळील महालक्ष्मी प्रवेशद्वारावरील महापुरुष व देवांचे फोटो असलेले बॅनर फाडून त्या ठिकाणी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचे उभे बॅनर लावल्याचा प्रकार धारूर तालुक्यातील भोगलवाडी फाटा येथे शनिवारी सकाळी साडेसहा वाजता घडला. याप्रकरणी दोन गटांत तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. बॅनर फाडून दोन समाजांत तेढ निर्माण केल्याप्रकरणी कारी (ता. धारूर) गावातील सहाजणांवर दिंद्रुड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शनिवारी सकाळी सात वाजता भोगलवाडी येथील उपसरपंच तुकाराम तिडके हे मॉर्निंग वॉक करताना भोगलवाडी फाट्यावर आल्यांनतर त्यांना महालक्ष्मी प्रवेशद्वारावर देवदेवता, संत, महापुरुष यांचे असलेले बॅनर फाडून त्या खाली मनोज जरांगे यांचे उभे बॅनर लावताना ११ जण दिसले. याची माहिती त्यांनी दिंद्रुड पोलिसांना फोन करून माहिती दिली. बॅनरच्या कारणावरून सकाळी साडेसात वाजता दोन गटांत तणाव निर्माण झाला. दिंद्रुड पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन शांततेचे आवाहन केले. या प्रकरणी येथील उपसरपंच तुकाराम तिडके(रा. भोगलवाडी, ता. धारूर) यांनी दिंद्रुड पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून नितीन मोरे, परमेश्वर मोरे, राजेभाऊ मोरे, किरण मोरे, किशोर मोरे, रोहित मोरे अशा एकूण सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, गुन्ह्याचा तपास पीएसआय एस. एस. शेख हे करीत आहेत.

नवीन बॅनर पूर्ववत लावलेदोन समाजांत तेढ निर्माण होण्याचा प्रसंग ओढावत असताना दिंद्रुड पोलिसांनी दोन्ही समाज बांधवांना समजून सांगत दोषींवर कारवाई केली जाईल, असे सांगितले. त्यानंतर भोगलवाडी फाटा येथील ‘त्या’ प्रवेशद्वारावर संत, देवदेवता व महापुरुषांचे नवीन बॅनर पूर्ववत लावण्यात येऊन जरांगे-पाटील यांचे लावलेले बॅनरही काढण्यात आले.

गुन्हा नोंदवण्यासाठी दुसरा गट दिंद्रुड ठाण्यातदरम्यान, शनिवारी रात्री दुसऱ्या गटातील २०० लोकांनी दिंद्रुड पोलिस ठाण्यात जाऊन विरोधी गटावरही गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी लावून धरली, तेव्हा सदरील गटास पोलिस निरीक्षक महादेव ढाकणे यांनी याप्रकरणी चौकशी करून योग्य कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeed Crimeबीड क्राईम मराठी बातम्या