शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

Beed: आधाराच्या नावाखाली शिक्षिकेवर अत्याचार, १ कोटीही लुटले; माजी ZP सदस्यावर गुन्हा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2025 17:10 IST

पैसे परत मागितल्यावर 'गाडीखाली चिरडून टाकीन' अशी धमकी. बीडमधील गुन्हेगाराची क्रूरता.

बीड : पतीने सोडल्यानंतर मानसिक आधार देण्याच्या बहाण्याने एका शिक्षिकेशी जवळीक साधून तिच्यावर २००६ ते २०२२ या काळात वारंवार अत्याचार केला. एवढेच नव्हे तर मुलांना नोकरी लावतो आणि पुण्यात फ्लॅट घेऊन देतो, असे सांगून त्याने पीडितेकडून तब्बल १ कोटी १० लाख रुपये उकळले. याप्रकरणी नेकनूर जिल्हा परिषद गटाचा माजी सदस्य नारायण शिंदे याच्याविरोधात बीडच्या शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित ५१ वर्षीय महिला शिक्षिका आहे. २००६ मध्ये तिच्या पतीचे दुसऱ्या महिलेसोबत अनैतिक संबंध होते. त्यानंतर पतीने दोन मुलांना घेऊन घर सोडले. यामुळे पीडिता मानसिक तणावात होती. तिच्या पतीचा मित्र असलेल्या नारायण शिंदेने याच परिस्थितीचा गैरफायदा घेतला. त्याने पीडितेला मानसिक आधार देण्याच्या बहाण्याने तिच्यावर अत्याचार केले. तसेच, पुण्यात फ्लॅट आणि मुलांना नोकरीचे आमिष दाखवून वेगवेगळ्या वेळी तिच्याकडून १ कोटी १० लाख रुपये घेतले. पीडितेने नंतर पैसे परत मागितल्यावर शिंदेने तिला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या. "वाहनाखाली चिरडून टाकीन," "खोट्या गुन्ह्यात अडकवेन" आणि "माझ्या ओळखी खूप वरपर्यंत आहेत," अशा धमक्या त्याने दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या त्रासाला कंटाळून पीडितेने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली.

धनंजय मुंडे, वाल्मीक कराडसोबत बैठकपैसे परत मिळत नसल्याने पीडिता, नारायण शिंदे, आमदार धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराड यांची परळीतील जगमित्र कार्यालयात २५ नोव्हेंबर २०२३ रोजी बैठक झाली होती. या बैठकीत शिंदेने सर्व पैसे परत देण्याचे आश्वासन दिले होते. "जर शिंदेने पैसे दिले नाहीत, तर त्याची भरपाई आम्ही करू," असा विश्वास धनंजय मुंडे आणि कराड यांनी पीडितेला दिला होता, असेही तक्रारीत नमूद आहे. मात्र, त्यानंतरही तिला न्याय मिळाला नाही, असे पीडितेने म्हटले आहे.

शिंदेला राजकीय पाठबळनारायण शिंदे हा नेकनूर जिल्हा परिषद गटातून जिल्हा परिषद सदस्य झाला होता. त्याने अनेक राजकीय पक्ष बदलले आहेत. मागील काही काळापासून तो राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचा जिल्हा उपाध्यक्ष होता. संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर संपूर्ण कार्यकारिणी बरखास्त करण्यात आल्याने तो सध्या पदावर नसल्याचे सांगण्यात येते. मात्र, अजित पवारांच्या दौऱ्यात तो अनेकदा दिसतो, तसेच कधीकधी शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांसोबतही तो पुण्यात भेटत असल्याचे सांगितले जाते.

टॅग्स :Beed Crimeबीड क्राईम मराठी बातम्याBeedबीडSexual abuseलैंगिक शोषण