बीड : तालुक्यातील कुर्ला येथील यशवंत विद्यालय परीक्षा केंद्रावर दहावीच्या विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था चक्क शाळेच्या छतावर मंडप टाकून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. या प्रकरणी शिक्षण विभागाने कडक पाऊल उचलत परीक्षा केंद्र संचालक अभिषेक राऊत यांना पदावरून हटवले असून, संस्थेने त्यांना निलंबित केले आहे. 'लोकमत'ने यासंदर्भात वृत्त प्रकाशित केल्यावर विभागीय मंडळाच्या अध्यक्षांनीही शाळेत जाऊन पाहणी केली होती.
परीक्षा केंद्रावर पुरेशा वर्गखोल्या नसतानाही केंद्र संचालकांनी शिक्षण विभागाच्या बैठकीत ही माहिती लपवून ठेवली. कोणतीही परवानगी न घेता शाळेच्या छतावर मंडप टाकून विद्यार्थ्यांना परीक्षेस बसवण्यात आले. हे करताना बोर्डाच्या परीक्षा नियमांकडे पूर्णतः दुर्लक्ष करण्यात आले होते. २४ जानेवारीला झालेल्या पूर्व तपासणीत सर्व वर्गखोल्यांत सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याच्या सूचना गटशिक्षणाधिकारी समंदरखान पठाण यांनी दिल्या होत्या, मात्र संचालकांनी मनमानी कारभार सुरूच ठेवला, असे चौकशीतून समोर आले आहे.
संस्थेकडून निलंबनाची कारवाईशिक्षणाधिकारी प्रियाराणी पाटील यांनी या गैरप्रकाराची गंभीर दखल घेऊन संबंधित संस्थेला केंद्र संचालकावर निलंबनाची कारवाई करण्याचे पत्र दिले होते. त्यानुसार संस्थेने राऊत यांना निलंबित केले असून, तसे पत्र शिक्षण विभागाला प्राप्त झाले आहे. वाढीव विद्यार्थी संख्या आणि अपुऱ्या सुविधांची माहिती वेळेत न दिल्याने ही कारवाई केली. १० फेब्रुवारीच्या परीक्षापूर्व बैठकीत विद्यार्थी संख्येतील बदलाची माहिती देणे बंधनकारक होते. मात्र, कुर्ला केंद्र संचालकांनी अपुऱ्या खोल्या व वाढीव विद्यार्थ्यांची माहिती लपवून थेट छतावर परीक्षा घेतली होती.
Web Summary : Kurla exam center director in Beed suspended for holding 10th grade exams on the school rooftop. The director concealed information about insufficient classrooms, violating exam regulations. An investigation revealed negligence, leading to the suspension after a Lokmat report and departmental inquiry.
Web Summary : बीड के कुर्ला परीक्षा केंद्र के निदेशक को छत पर 10वीं की परीक्षा आयोजित करने पर निलंबित कर दिया गया. निदेशक ने अपर्याप्त कक्षाओं की जानकारी छिपाई, परीक्षा नियमों का उल्लंघन किया. जांच में लापरवाही सामने आने के बाद कार्रवाई हुई.