शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बीडमध्ये रूग्ण नसलेल्या भरधाव रूग्णवाहिकेने दोन महिलांना उडविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 00:53 IST

रूग्ण नसतानाही मद्यपान करून सायरन वाजवित आलेल्या भरधाव रूग्णवाहिकेने दोन महिलांना उडविले. हातगाडा आडवा आल्याने त्या दोन्ही महिला किरकोळ जखमी होऊन बालंबाल बचावल्या.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : रूग्ण नसतानाही मद्यपान करून सायरन वाजवित आलेल्या भरधाव रूग्णवाहिकेने दोन महिलांना उडविले. हातगाडा आडवा आल्याने त्या दोन्ही महिला किरकोळ जखमी होऊन बालंबाल बचावल्या. ही घटना जिल्हा रूग्णालयातील पोलीस चौकीच्या पाठीमागे मंगळवारी दुपारी ४ वाजता घडली.प्रेमा जाधव (रा.मुंबई) व पार्वती माने (रा.चांदेगाव ता.बीड) असे जखमी महिलांचे नावे आहेत. पार्वती माने यांच्या नातेवाईकाचे अ‍ॅपेंडेक्सची शस्त्रक्रिया झालेली असून त्यांचा रूग्ण वॉर्ड क्रमांक पाच मध्ये उपचार घेत आहे. या रूग्णाला भेटण्यासाठीच प्रेमा जाधव या मुंबईहून आल्या होत्या. रूग्णासोबत गप्पा झाल्यानंतर त्यांना काहीतरी खायला घेऊन जाण्यासाठी ते रूग्णालयाबाहेर आल्या. एका हातगाड्यावर खरेदी करीत असतानाच रूग्ण नसलेली रूग्णवाहिका (एमएच २० डब्ल्यू ९६६२) भरधाव वेगात आली. बाजुला दुसरी रूग्णवाहिका असल्याने चालकाने वाहन थेट हातगाड्यावर घातले. हातगाडा पूर्णपणे मोडून दोन महिलांना उडविले. यामुळे दोन्ही महिला बाजूच्याच नाल्यात पडल्या. यामध्ये दोघींच्याही पाय, हात आणि कमरेला गंभीर जखम झाली. त्यांना जवळीच नागरिकांनी तातडीने जिल्हा रूग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर उपचार करण्यात आले. सुदैवाने हातगाडा आडवा असल्याने या दोन्ही महिलांचे प्राण वाचल्याची चर्चा येथे ऐकावयास मिळाली.विशेष म्हणजे रूग्णवाहिकेचा चालक आणि त्याचा मित्र मद्यपान केल्याचे सांगण्यात आले. खरा चालक बाजूला बसला होता तर त्याचा मित्र रूग्णवाहिका चालवित होता, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. रूग्ण नसतानाही नशेत त्यांनी सायरण लावला होता आणि रूग्णवाहिका भरधाव वेगाने नेली जात होती. याचवेळी हा अपघात झाला. त्यानंतर याच चालकाने नागरिकांना उद्धट भाषा वापरली.कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी येथे पोलीस चौकी आहे. मात्र घटनेच्यावेळी याठिकाणी एकही पोलीस कर्मचारी उपस्थित नव्हता. याबाबत अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपअधीक्षक सुधीर खिरडकर यांना माहिती दिल्यानंतर त्यांनी शहर पोलीस ठाण्याला आदेश देत तात्काळ कर्मचारी पाठविले. दरम्यान, सोमवारी केवळ पाच तासांत तीन दुचाकी चोरी गेल्या होत्या. आणि मंगळवारी घटनेच्यावेळी पोलिसांची अनुपस्थिती यावरून चौकीतील ढिसाळ कारभार चव्हाट्यावर येतो.उशिरापर्यंत तक्रारदाखल नाहीअपघातात जखमी झालेल्या महिलांनी तक्रार देऊ नये, यासाठी २३ क्रमांकाच्या कक्षात काही चालकांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांच्यावर दबावही आणण्याचा प्रयत्न केला. मात्र रूग्णालयातील कर्मचारी इतर सुजान नागरिकांनी त्यांचा हा डाव हाणून पाडला. तरीही रात्री उशिरापर्यंत याची नोंद पोलीस दप्तरी झालेली नव्हती.

टॅग्स :AccidentअपघातCrime Newsगुन्हेगारीhospitalहॉस्पिटल