शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

बीड हादरले! अल्पवयीन मुलीस शेतात ओढून नेत सामूहिक अत्याचार, तीन आरोपी अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2022 14:55 IST

एका महिलेने सामुहिक अत्याचार होत असताना पीडित मुलीचे नग्न फोटो काढले.

दिंद्रुड (बीड): एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार झाल्याची घटना दिंद्रुड पोलीस स्टेशन हद्दीत रविवारी सायंकाळी उघडकीस आली. दरम्यान दिंद्रुड पोलिसात पाच आरोपीं विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. यातील तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, आज सकाळी पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर व अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेहरकर यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली.

याबाबत अधिक माहिती अशी की, मंठा तालुक्यातील एक कुटुंब दिंद्रुड पोलीस स्टेशन हद्दीतील एका शेतकऱ्याच्या शेतावर कामाला आहे. शुक्रवारी सकाळी आईवडील शेतात कामाला गेल्याने त्यांची १७ वर्षीय मुलगी घरी एकटीच होती. ही संधी साधत बाळू उर्फ महादेव सुधाकर फपाळने पीडित मुलीला शेजारील उसाच्या फडात ओढत नेले. तिथे तिच्यावर विजय दशरथ फपाळ, अमोल प्रभाकर फपाळ, अक्षय अर्जुन फपाळ या तिघांनी आळीपाळीने अत्याचार केला. 

दरम्यान, एका महिलेने सामुहिक अत्याचार होत असताना पीडित मुलीचे नग्न फोटो काढले. या घटनेमुळे दिंद्रुड परिसरात खळबळ उडाली आहे.  अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून दिंद्रुड पोलिस ठाण्यात एका महिलेसह महादेव सुधाकर फपाळ, विजय दशरथ फपाळ, अमोल प्रभाकर फपाळ आणि अक्षय अर्जुन फपाळ यांच्यावर बाललैंगिक अत्याचार, ॲट्रॉसिटीनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपविभागीय अधिकारी आयपीएस डॉ. धीरज कुमार बच्चू यांनी दिंद्रुड पोलीस स्टेशनला भेट दिली.

दरम्यान, विजय दशरथ फपाळ, अमोल प्रभाकर फपाळ व अक्षय अर्जुन फपाळ या तीन आरोपींना पोलिसांनी तात्काळ जेरबंद केले. ही कारवाई दिंद्रुड पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभा पुंडगे, युवराज श्रीडोळे, विशाल मुजमुले, मुकेश शेळके, रेवण दुधाने यांनी केली. यातील दोन आरोपी फरार असून पुढील तपास डॉ. धीरजकुमार बच्चू करत आहेत.

आरोपींना ३ दिवसांची पोलीस कोठडीताब्यातील सर्व आरोपींना दिंद्रुड पोलिसांनी माजलगाव सत्र न्यायालयात आज हजर केले. यावेळी न्यायालयाने सर्व आरोपींना २२ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीड