गेवराई : तालुक्यातील वाहेगाव आम्ला येथे ४५ वर्षीय मुलाने सोमवारी (दि. २८) रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या घटनेचा धक्का सहन न झाल्यामुळे मुलाच्या आईनेही विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली आहे. या प्रकरणी तलवाडा पोलिस ठाण्यात घटनेची नाेंद करण्यात आली आहे.
अभिमान भागूजी खेत्रे (४५, रा. वाहेगाव आम्ला, ता. गेवराई) असे गळफास घेऊन आत्महत्या करणाऱ्याचे नाव आहे. त्यांनी शेतातील झाडाला सोमवारी दुपारी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही माहिती त्यांच्या आई कौशल्या भागूजी खेत्रे यांना समजताच त्यांनीही विषारी औषध प्राशन केले. त्यांना उपचारासाठी बीड येथील जिल्हा रुग्णालय दाखल केले. त्याच्यावर उपचार सुरू असतानाच मंगळवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाला. एकाच घरात दोघांच्या आत्महत्येच्या घटनांमुळे गावावर शोककळा पसरली आहे. मुलाने आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.