शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

Beed: जिल्हा परिषद शाळेत चार विद्यार्थिनींचा लैंगिक छळ; माजलगावात शिक्षकावर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2025 19:28 IST

आरोपी शिक्षक हा दोन महिन्यांपूर्वीच या शाळेवर बदलून आला होता. यापूर्वी कार्यरत असलेल्या शाळेवरही त्याने असाच प्रकार केल्याची माहिती समोर येत आहे.

माजलगाव : तालुक्यातील ग्रामीण भागातील एका जिल्हा परिषद शाळेत इयत्ता तिसरी ते चौथीच्या चार शालेय मुलींना धमक्या देऊन त्यांचा लैंगिक छळ केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी विष्णू झोंबाडे नावाच्या शिक्षकाविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्यास अटक केली.

माजलगाव शहरापासून जवळच असलेल्या या शाळेत मागील पंधरा दिवसांपासून शिक्षक विष्णू झोंबाडे हा धमक्या देऊन इयत्ता तिसरी ते चौथीच्या वर्गातील मुलींचा लैंगिक छळ करत होता. या चार मुलींपैकी एका मुलीने ही माहिती आपल्या कुटुंबाला सांगितल्यानंतर हादरलेल्या कुटुंबीयांनी सोमवारी तातडीने पोलिसांकडे धाव घेतली. ग्रामीण पोलिसांनी तत्काळ शिक्षक विष्णू झोंबाडे यास अटक करून त्याच्याविरुद्ध लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे.

पालकांमध्ये संताप व मागणीया घटनेमुळे पालकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे. आरोपी शिक्षक हा दोन महिन्यांपूर्वीच या शाळेवर बदलून आला होता. यापूर्वी कार्यरत असलेल्या शाळेवरही त्याने असाच प्रकार केल्याची माहिती समोर येत आहे. “शैक्षणिक पवित्र कार्य असताना शिक्षक असे करत असतील, तर विद्यार्थ्यांचे भवितव्य काय?” असा प्रश्न पालक व्यक्त करत आहेत. दरम्यान, आरोपीस कठोर शिक्षा व्हावी, यासाठी आपण पोलिस अधीक्षकांची मंगळवारी भेट घेणार असल्याची माहिती पीडित मुलींच्या पालकांनी दिली आहे. पालकांनी आमच्या शाळेवर महिला शिक्षिका नियुक्त करावी, अशी मागणी केली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Beed: Teacher Arrested for Sexually Assaulting Four Schoolgirls in Majalgaon

Web Summary : A teacher in Majalgaon, Beed, has been arrested for sexually abusing four young female students. Vishnu Zombade, the accused, allegedly threatened the girls. Parents are outraged and demand stricter action and female teachers.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीडBeed Crimeबीड क्राईम मराठी बातम्या