बीड ‘रापम’मध्ये महिलांचा अधिकाऱ्यांकडून छळ...?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2019 12:19 AM2019-08-06T00:19:05+5:302019-08-06T00:21:25+5:30

राज्य परिवहन महामंडळाच्या बीड विभागात काम करणाºया महिला सध्या भीतीयुक्त वातावरणात काम करीत आहेत. कार्यालयातीलच वरिष्ठ अधिकारी महिला कर्मचाऱ्यांचा छळ करीत असल्याचे तक्रारींवरून समोर आले आहे.

Beed 'rapam' harasses women officers ...? | बीड ‘रापम’मध्ये महिलांचा अधिकाऱ्यांकडून छळ...?

बीड ‘रापम’मध्ये महिलांचा अधिकाऱ्यांकडून छळ...?

googlenewsNext
ठळक मुद्देअसुरक्षितता : चौकशी समितीकडून ‘दक्षता’ न घेतल्याने भीतीचे वातावरण

बीड : राज्य परिवहन महामंडळाच्या बीड विभागात काम करणा-या महिला सध्या भीतीयुक्त वातावरणात काम करीत आहेत. कार्यालयातीलच वरिष्ठ अधिकारी महिला कर्मचाऱ्यांचा छळ करीत असल्याचे तक्रारींवरून समोर आले आहे. मागील काही दिवसांत तीन घटना घडल्या असून सध्या त्या दक्षता समितीकडे चौकशीसाठी देण्यात आलेल्या आहेत. ही चौकशीही अतिशय संथ गतीने सुरू असल्याने वरिष्ठांकडून आरोपीच्या पिंजºयात असलेल्यांची पाठराखण केली जात असल्याचा आरोप होत आहे.
सध्या प्रत्येक कार्यालयात पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून महिला काम करीत आहेत. राज्य परिवहन महामंडळातही अगदी शिपायापासून ते अधिकारी पदापर्यंत महिला काम करतात. कामाच्या निमित्ताने महिलांचे वरिष्ठांचे अथवा सहकाºयांशी नेहमीच बोलणे असते. मात्र, याचाच गैरफायदा काही अधिकारी घेत असल्याचे समोर येत आहे. दोन महिला वाहकांसह एका महिला लिपिकाने वरिष्ठ अधिकाºयांविरोधात तक्रारी दिल्या आहेत. या सर्व तक्रारी मानसिक त्रास व छळ होत असल्याच्या आहेत.
अधिका-यांविरोधात तक्रार असल्यास प्रत्येक कार्यालयात तक्रारीवर प्राथमिक चौकशी करण्यासाठी महिला अधिकाºयांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समिती असते. या समितीकडे या तिनही तक्रारी असल्याचे सांगण्यात आले. मात्र, याच्या निकालाबाबत समिती व विभागीय नियंत्रकांकडून माहिती देण्यास आज-उद्या करून टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे आरोपीच्या पिंज-यात असलेल्या अधिका-यांनाही वरिष्ठांचे ‘अभय’ असल्याचा आरोप केला जात आहे. ही सर्व प्रकरणे निकाली काढून महिलांना न्याय देण्याची मागणी कर्मचाºयांमधून होत आहे. सध्या ‘रापम’तील महिला कर्मचारी भीतीयुक्त वातावरणात असून, बोलण्यास नकार देत आहेत.
अधिका-यांकडून तक्रारदारांवर दबाव
ज्या महिलांनी वरिष्ठांविरोधात गंभीर स्वरूपाच्या तक्रारी दिल्या आहेत, त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यांच्यावर दबाव आणला जात असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते. दुस-या बाजूला दक्षता समितीकडून तक्रारी निकाली काढण्यास दिरंगाई केली जात आहे. या सर्व प्रकारामुळे संशय व्यक्त केला जात आहे.
डीसी म्हणतात, काय ते आम्ही बघू ना...
विभागीय नियंत्रक जालींदर सिरसाठ यांनीही या गंभीर तक्रारींकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. उद्या माहिती घेऊन देतो, असे सांगत त्यांनी टोलवाटोलवी केली. तक्रारींचे काय ते आम्ही बघून घेऊ, असे सांगत त्यांनी हात झटकले. त्यामुळे या प्रकरणांचे वरिष्ठांनाही गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे.

Web Title: Beed 'rapam' harasses women officers ...?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.