शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

रॅगिंगमुळे आत्महत्या प्रकरणाचा तपास बीड पोलीसच करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 12:02 IST

महाविद्यालय प्रशासन हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप गणेशच्या नातेवाईकांनी केला.

ठळक मुद्देव्हिडिओमुळे रॅगिंगला पुष्टीअधीक्षकांच्या निर्णयाचे नाळवंडीत स्वागत 

- प्रभात बुडूख 

बीड : बीड जिल्ह्यातील गणेश कैलास म्हेत्रे (२०, रा. नाळवंडी, ता. बीड) या मेडिकलच्या विद्यार्थ्यांने रॅगिंगमुळे आत्महत्या केली होती. या प्रकरणाचा तपास उदगीर (ता. लातूर) येथे वर्ग करण्याच्या हालचाली सुरु होत्या. मात्र, सदर तपास पिंपळनेर पोलिसांनीच करावा, असे स्पष्ट निर्देश पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी मंगळवारी दिले; परंतु महाविद्यालय प्रशासन हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप गणेशच्या नातेवाईकांनी केला.

गणेश म्हेत्रे  हा विद्यार्थी उदगीर (जि. लातूर) येथील धन्वंतरी आयुर्वेदिक महाविद्यालयात शिक्षण घेत होता. दरम्यान रॅगिंगला कंटाळून त्याने ७ फेब्रुवारी रोजी नाळवंडी येथे शेतात जाऊन विष प्राशन केले होते. उपचारादरम्यान त्याचा ८ फेब्रुवारी रोजी मृत्यू झाला होता. त्यानंतर ही आत्महत्या रॅगिंगला कंटाळून झाली असा नातेवाईकांचा आरोप होता. त्यासंदर्भातील काही आॅडिओ क्लिप व व्हीडीओ देखील त्यांना मिळाले आहेत. त्यामुळे उदगीर येथील धन्वंतरी आयुर्वेदिक महाविद्यालयात रॅगिंग होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान पिंपळनेर पोलिसांकडून हात झटकत हे प्रकरण उदगीर पोलिसांकडे वर्ग करण्याची कार्यवाही सुरु होती. मात्र, पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी याप्रकरणातील संपूर्ण कागदपत्रे तपासली व त्यानंतर हा गुन्हा उदगीर येथे वर्ग न करण्याचे त्यांनी ठरविले. दरम्यान या गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळनेर पोलीसच करतील, असे निर्देशदेखील पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी यावेळी दिले आहेत.

ऑडिओनंतर व्हिडिओदेखील झाला प्रसारितउदगीर येथील धन्वंतरी आयुर्वेदिक महाविद्यालयात होत असलेल्या रॅगिंग संदर्भात तसेच गणेश म्हेत्रे याला धमकावल्याची ऑडिओ क्लिप पोलिसांच्या ताब्यात आली होती. दरम्यान, असाच प्रकार महाविद्यालयाच्या एका खोलीत प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना घेऊन त्यांना गाण्यावर डान्स करायला लावतानाचा व्हिडिओदेखील सोशल मीडियावर प्रसारित होत आहे. त्यामुळे संबंधित रॅगिंग करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी अटक करून कारवाई करावी, अशी मागणी नाळवंडी ग्रामस्थांकडून होत आहे. 

बीड जिल्ह्यातील महाविद्यालयांना पत्रच् या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी बीड आणि अंबाजोगाईच्या अपर पोलीस अधीक्षकांना पत्र दिले असून, त्यात आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व महाविद्यालयांच्या प्राचार्यांना त्यांच्या महाविद्यालयात रॅगिंगसारखे प्रकार होणार नाहीत याची दक्षता घेण्याच्या सूचना देण्याचे दिण्याचे आदेश दिले आहेत. तसेच महाविद्यालयात असे प्रकार होत असतील, तर शिक्षक व विद्यार्थ्यांनी पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोद्दार यांनी केले आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थीSuicideआत्महत्याBeedबीडPoliceपोलिस