शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाचा मुहूर्त ठरला, विधी सुरू झाले आणि पोलीस दाखल; लग्नाच्या मंडपातून नवरदेव गेला पळून!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2026 12:42 IST

Beed: बीडमधील एका हृदयद्रावक घटनेत पोलिसांनी वेळेवर धाव घेत एका १७ वर्षीय विद्यार्थिनीचे आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचवले आहे.

सोमनाथ खताळलोकमत न्यूज नेटवर्क बीड: दहावीत ८५ टक्के गुण मिळवून विज्ञान शाखेत शिक्षण घेणाऱ्या १७ वर्षीय विद्यार्थिनीचा बालविवाह रोखण्यात पोलिसांना गुरुवारी यश आले. बीड तालुक्यातील कपिलधार येथे विवाहसोहळा सुरू असतानाच पोलिस व सामाजिक कार्यकर्त्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांना पाहताच नवरदेव, नातेवाईक व वऱ्हाडी मंडळींनी मंडपातून पळ काढला. 

१८ डिसेंबर २०२५ रोजी एका महाविद्यालयीन तरुणीचे भरदिवसा अपहरण झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण होते. आपल्या मुलीलाही एक मुलगा त्रास देत असल्याने, तिच्याबाबतही अशीच दुर्घटना घडेल या भीतीने आईने मुलीचे लग्न लावून देण्याचा निर्णय घेतला. वडील बेरोजगार असल्याने कुटुंबातील असुरक्षिततेची भावना या निर्णयामागे कारणीभूत ठरली.

कपिलधार देवस्थानवर यापूर्वीही बालविवाह

गुरुवारी दुपारी कपिलधार देवस्थान येथे विवाहाचा मुहूर्त होता. ही माहिती सामाजिक कार्यकर्ते तत्त्वशील कांबळे यांनी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला कळवली. पोलिसांनी मुलीला ताब्यात घेत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली. कपिलधार देवस्थानात यापूर्वीही बालविवाह रोखले गेले आहेत. वयाचा पुरावा न तपासता विवाहास अप्रत्यक्ष परवानगी दिली जात असल्याचा आरोप असून, देवस्थान समितीची चौकशी करून कडक कारवाईची मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Child marriage halted; groom flees as police arrive at ceremony.

Web Summary : Police stopped a child marriage in Beed after receiving a tip. The 17-year-old girl was forced into marriage due to safety concerns. The groom and relatives fled upon seeing the police. An investigation is underway regarding the temple's role in allowing underage marriages.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीड