शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics :"दोन ‘बंधू’ एकत्र येणार, त्यामुळे अनेकांच्या पोटात भीतीचा गोळा..."; सामनातून विरोधकांना डिवचले, संकेतही दिले
2
‘अटी’तटीत अडकली ठाकरे युती, चर्चेचे गुऱ्हाळ सुरूच; मनसेची आक्रमक भूमिका
3
काश्मीरमध्ये हाहाकार! ढगफुटीने तीन जणांचा मृत्यू; १०० हून अधिक लोकांना वाचवण्यात यश
4
"भारतातील निवडणूक प्रक्रियेत...’’, महाराष्ट्रातील मतदानाचा उल्लेख करत राहुल गांधींचं अमेरिकेत मोठं विधान
5
अमेरिका-चीन ट्रेडवॉरचा फायदा; जागतिक स्मार्टफोन-लॅपटॉप कंपन्या भारतात येण्यास तयार
6
राज्यात हिंदीची सक्ती नाहीच, इतर भाषेचा पर्याय घेता येणार; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
7
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २१ एप्रिल २०२५: साशंक वृत्ती आपल्या मनाला अस्वस्थ करेल
8
साहेब, तुमच्या लाडक्या बहिणीच्या मुलीने गळफास घेतला, त्या क्रूर नराधमांना शिक्षा द्या
9
दोन मुलांना मारून टाकणार, पेटवून घेणार; महिलेचा 'तो' ईमेल आणि विख्यात डॉक्टरांनी संपवलं जीवन
10
राज्यात उन्हाने होरपळ, उकाड्यानं नागरिक हैराण; उष्णतेच्या लाटेचा इशारा
11
"मोदीजी या लोकांना रोखले नाही, तर..."; निशिकांत दुबे यांच्या विधानावरून ओवेसींचा हल्लाबोल
12
'असा' शिक्षक विद्यार्थ्यांना काय शिकवणार?; शिक्षणाचा खेळखंडोबा म्हणजे देशाशी गद्दारी!
13
मुंबई विद्यापीठासाठी उघडले संशोधनाचे नवे दालन; आयआयटी-मुंबईच्या ‘हब’ संस्थेत समावेश
14
तारीख पे तारीखचा खेळ सुरू; यावर्षीही महापालिका निवडणुका होणार नाहीत..?
15
दोन टक्के व्याजासाठी विकासाला खीळ घालणे अमान्य; BMC आयुक्तांनी सांगितलं कारण...
16
आर्थिक राजधानीतही ‘हुंड्याचा फास’! अवघ्या २ वर्षांतच लक्ष्मीने गळफास घेऊन आयुष्य संपवले
17
रेल्वे पोलिसांकडून २९ बालकांची सुटका; मुंबई-चेन्नई एक्स्प्रेसमध्ये संशयास्पदरीत्या वाहतूक
18
पकडा आणि परत पाठवा! अमेरिका,चीन वर्चस्ववादाच्या लढाईने जागतिकीकरणाच्या आशयाचा पराभव
19
१२ हजार माणसांबरोबर धावले २० रोबोट्स; अखेरीस मॅरेथॉन स्पर्धेत जिंकलं कोण?
20
डॉक्टरांचा हलगर्जीपणा रुग्णाच्या मृत्यूस कारण?; नायर रुग्णालयाने सर्व आरोप फेटाळले

बीड पोलिस अॅक्शन मोडवर; वाळू माफिया, गुंडांनंतर हाफ मर्डरच्या गुन्ह्यातील आरोपींना तंबी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 15:52 IST

जिल्हाभरातून आलेल्या १९२ आरोपींची बीडच्या पोलिस अधीक्षक कार्यालयात परेड

बीड : जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी बीड पोलिसांकडून काळजी घेतली जात आहे. रेकॉर्डवरील गुन्हेगारांना बोलावून घेत प्रतिबंधात्मक कारवाया करून यापुढे गुन्हे केल्यास तडीपार, एमपीडीए, मकोकासाख्या गुन्ह्याची तंबी दिली जात आहे. याअगोदर वाळू माफियांसह गुंडांना बोलावून घेत परेड घेतली होती. मंगळवारी हाफ मर्डरसह शरीराविरुद्धचे गुन्हे करणाऱ्यांना बोलावून घेत परेड घेतली. शांतता ठेवा, अन्यथा कडक कारवाईचा इशारा पोलिसांनी दिला.

केज तालुक्यातील मस्साजाेगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या दि. ९ डिसेंबर २०२४ रोजी झाली. त्यानंतर जिल्ह्यात वादळ निर्माण झाले. यात अनेक राजकीय नेत्यांशी संबंधित आरोपी सापडले. त्यामुळे हे प्रकरण राज्यभर गाजले. हिवाळी अधिवेशनातही हा मुद्दा चर्चेला आहे. त्यामुळे तत्कालीन पोलिस अधीक्षकांची बदलीही करण्यात आली. तसेच बीडमधील गुन्ह्यांचा आढावा घेत बीड आहे की बिहार? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. जिल्ह्यातील आमदार सुरेश धस, आमदार संदीप क्षीरसागर, आमदार प्रकाश सोळंके, आमदार नमिता मुंदडा, आमदार विजयसिंह पंडित आदींनी यावर आवाज उठविला. जिल्ह्यात शांतता ठेवण्यासाठी आवाहन केले. त्याच अनुषंगाने बीड पोलिसही काम करत आहेत. वेगवेगळ्या गंभीर गुन्ह्यातील आरोपींना बोलावून घेत त्यांना शांत राहण्याच्या सूचना केल्या जात आहेत. तसेच यापुढे गुन्हे केल्यास कठोर कारवाईचा इशारा दिला जात आहे. मंगळवारीही पाेलिस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर यांच्यासह इतरांनी गंभीर गुन्ह्यातील आरोपींना सूचना केल्या.

आता कोणाचा नंबर?सर्वांत अगोदर वाळू, गौण खनिज माफियांना बोलावून घेत परेड घेतली. त्यानंतर जिल्हा विशेष शाखेत असलेल्या गुंडा रजिस्टरची माहिती घेऊन त्यांना बाेलावले. आता शरीराविरुद्धचे गुन्हे करणाऱ्या हाफ मर्डरच्या गुन्ह्यातील आरोपींना मंगळवारी बोलाविले होते. आता पुढचा क्रमांक कोणाचा? याकडे लक्ष लागले आहे.

सामान्यांना त्रास देऊ नकागुन्हेगारांप्रमाणेच पोलिस दलातील काही पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांचीही कानउघाडणी करण्यात आली आहे. सामान्य लोकांची कामे वेळेत मार्गी लावा. त्यांना त्रास होईल, असे कामे करू नका. पोलिसांबद्दल सर्वांच्या मनात विश्वास निर्माण करा, अशा सूचना अधीक्षक काँवत यांनी दिल्या आहेत. जर कोणी त्रास दिल्याची तक्रार आली तर संबंधित पोलिसावरही कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही अधीक्षकांनी दिला आहे.

एसपी ऑफिसमध्ये गर्दीजिल्हाभरातील आरोपी पोलिस अधीक्षक कार्यालयात मंगळवारी सकाळी १० वाजताच जमा झाले. त्यांची दुपारी २ वाजेच्या सुमारास परेड घेण्यात आली. तत्पूर्वी हे सर्व लोक परिसरात, कार्यालयात फिरत होते. त्यामुळे सर्वत्र गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले.

कोणत्या उपविभागातील किती आरोपी?बीड ६१ गेवराई २८आष्टी २७माजलगाव २१केज २३अंबाजोगाई ३२एकूण १९२

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीडBeed policeबीड पोलीस