गुन्हे उघड करण्यात मराठवाड्यात ‘बीड पोलीस’ अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 03:35 PM2018-01-18T15:35:59+5:302018-01-18T15:40:55+5:30

खून, दरोडे, अत्याचार, दरोडा यासारख्या गुन्ह्यांचा १०० टक्के  तपास लावून बीड जिल्हा पोलीस दलाने महाराष्ट्रात पाचवा, तर मराठवाड्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. नुकतीच पोलीस महासंचालकांनी ही आकडेवारी जाहीर केली आहे. औरंगाबाद, नांदेड सारख्या मोठ्या जिल्ह्यांना मागे टाकत बीड जिल्हा अव्वल राहिला आहे.

'Beed Police' in Marathwada on top to reveal crime | गुन्हे उघड करण्यात मराठवाड्यात ‘बीड पोलीस’ अव्वल

गुन्हे उघड करण्यात मराठवाड्यात ‘बीड पोलीस’ अव्वल

googlenewsNext
ठळक मुद्देखून, दरोडे, अत्याचार, दरोडा यासारख्या गुन्ह्यांचा १०० टक्के  तपास लावून बीड जिल्हा पोलीस दलाने महाराष्ट्रात पाचवा, तर मराठवाड्यात प्रथम क्रमांक पटकावला आहेपोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, अजित बोराडे यांच्याकडून प्रत्येक गुन्ह्याचा तपास लावण्यासंदर्भात अधिकारी, कर्मचार्‍यांना पाठपुरावा केला जातो

बीड : खून, दरोडे, अत्याचार, दरोडा यासारख्या गुन्ह्यांचा १०० टक्के  तपास लावून बीड जिल्हा पोलीस दलाने महाराष्ट्रात पाचवा, तर मराठवाड्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. नुकतीच पोलीस महासंचालकांनी ही आकडेवारी जाहीर केली आहे. औरंगाबाद, नांदेड सारख्या मोठ्या जिल्ह्यांना मागे टाकत बीड जिल्हा अव्वल राहिला आहे.

पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, अजित बोराडे यांच्याकडून प्रत्येक गुन्ह्याचा तपास लावण्यासंदर्भात अधिकारी, कर्मचार्‍यांना पाठपुरावा केला जात होता. स्थानिक गुन्हे शाखा, दरोडा प्रतिबंधक पथक व जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी यांनी वरिष्ठांचा विश्वास सार्थ ठरवला.

गेवराईतील घाडगे दाम्पत्य हत्या प्रकरण राज्यभर गाजले. याचा तपास बीड पोलिसांनी अवघ्या आठवडाभरात पूर्ण केला. यावेळी पो. नि. दिनेश आहेर हे स्थानिक गुन्हे शाखेमध्ये कार्यरत होते. त्यांची बदली झाल्यानंतर येथे पो. नि. घनश्याम पाळवदे यांची नियुक्ती झाली. त्यांनी जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेगारी टोळ्यांविरुद्ध कारवाईची मोहीम हाती घेतली. वस्ती तपासण्याबरोबरच खून, दरोडे, चोर्‍यांचा तपास लावण्याबरोबरच प्रतिबंधात्मक कारवायांवर जोर दिला. जिल्हा पोलीस दलाने एकत्रितपणे कामगिरी केल्यामुळेच राज्यात पाचवा, तर मराठवाड्यात प्रथम क्रमांक पटकावण्यात ते यशस्वी झाले.

शरीर, मालाविरुद्धच्या गुन्ह्यात राज्यात प्रथम
शरीर, मालाविरुद्धचे ८८.८० टक्के गुन्हे उघडकीस आणण्यात बीड पोलिसांना यश आले आहे. त्यामुळे राज्यात प्रथम क्रमांकावर आहेत. तसेच एमपीडीए कारवाईतही जिल्हा अव्वल आहे. तडीपार, मोक्का, प्रतिबंधात्मक कारवायातही बीड जिल्हा पोलीस दलाची कामगिरी उत्कृष्ट आहे.

गुन्ह्यांचे प्रकार    दाखल    उघड    प्रमाण (टक्के)
खून                         ५६    ५६    १००
खूनाचा प्रयत्न        १०५    १०४    ९९
जबरी संभोग          ६६    ६६    १००
दरोडा                     १२    १२    १००
जबरी चोरी            ६८    ५६    ८२
जुगार               १४२८    १४२८    १००
दारुबंदी           २८८५    २८८५    १००

जनतेचा पोलिसांप्रती विश्वास वाढत आहे

गुन्हे उघड करण्याबरोबरच चोरीचा तपास लावून हस्तगत केलेला मुद्देमाल फिर्यादींना सन्मानपूर्वक सार्वजनिक कार्यक्रमातून परत केला जात आहे. त्यामुळे जनतेचा पोलिसांप्रती विश्वास वाढत आहे. यापुढेही जनतेसाठी चांगले कार्य करण्यासाठी जिल्हा पोलीस दल नेहमीच तत्पर राहील.
- जी. श्रीधर, पोलीस अधीक्षक, बीड

नागरिकांचे सहकार्य महत्वाचे 

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक गुन्ह्याचा तपास लावणे सुरु आहे. गुन्हेगारांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाया केल्या जात आहेत. तसेच प्रतिबंधात्मक कारवायांवरही आमचा जोर आहे. नागरिकांनी सहकार्य करावे.
- घनश्याम पाळवदे, पो. नि., स्थानिक गुन्हे शाखा, बीड

Web Title: 'Beed Police' in Marathwada on top to reveal crime

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.