शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

Beed Parishad Election Result 2025: बीडमध्ये क्षीरसागर बंधूंना धक्का; राष्ट्रवादीच्या प्रेमलता पारवे नगराध्यक्षपदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2025 17:25 IST

या निवडणुकीत शेवटच्या क्षणापर्यंत श्वास रोखून धरणारा थरार पाहायला मिळाला.

बीड: बीड नगरपालिकेच्या निवडणुकीत आजपर्यंतचा सर्वात मोठा राजकीय चमत्कार पाहायला मिळाला आहे. मागील अनेक वर्षांपासून नगरपालिकेवर असलेली क्षीरसागर घराण्याची एकहाती सत्ता बीडच्या मतदारांनी दूर सारली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) उमेदवार प्रेमलता पारवे यांनी ३,७७९ मतांनी विजय मिळवत नगराध्यक्ष पदावर नाव कोरले. क्षीरसागर घराण्याने ठरवलेल्या उमेदवारा व्यतिरिक्त नगराध्यक्ष झाल्याने ऐनवेळी भाजपत गेलेले डॉ. योगेश क्षीरसागर आणि राष्ट्रवादीचे ( शप) आमदार संदीप क्षीरसागर या दोन्ही बंधूंना हा मोठा धक्का मानला जात आहे. 

या निवडणुकीत शेवटच्या क्षणापर्यंत श्वास रोखून धरणारा थरार पाहायला मिळाला. दहाव्या फेरीपर्यंत भाजपच्या डॉ. ज्योती घुम्रे यांनी आघाडी घेतली होती, मात्र शेवटच्या टप्प्यात प्रेमलता पारवे यांनी मुसंडी मारली. पारवे यांना ३५,८१२ मते मिळाली, तर डॉ. ज्योती घुम्रे ३५,०३३ मतांवर अडकल्या. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) च्या स्मिता वाघमारे यांना २५,४४० मतांवर समाधान मानावे लागले.

क्षीरसागर बंधूंना दणका डॉ. भारतभूषण क्षीरसागर आणि डॉ. योगेश क्षीरसागर यांची नगरपालिकेतील मक्तेदारी संपवण्यासाठी बीडकरांनी यावेळी परिवर्तनाचा पवित्रा घेतला होता. डॉ. योगेश क्षीरसागर यांनी भाजपमध्ये प्रवेश करून 'संजीवनी' मिळवण्याचा प्रयत्न केला, मात्र मतदारांनी त्यांना नाकारले. दुसरीकडे, आमदार संदीप क्षीरसागर यांनी पूर्ण ताकद लावूनही त्यांची यंत्रणा कमी पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

अमरसिंह पंडितांचा 'बीड' पॅटर्न यशस्वीमाजी आमदार अमरसिंह पंडित यांनी गेवराईत आपला गड गमावला असला तरी, बीडमध्ये मात्र त्यांनी विजयाची गणिते अचूक जुळवली. प्रेमलता पारवे यांच्या पाठीशी आपली संपूर्ण यंत्रणा उभी करून त्यांनी क्षीरसागरांच्या वर्चस्वाला सुरुंग लावला.

नगरसेवक पदाचे पक्षनिहाय बलाबल (एकूण ५० जागा):राष्ट्रवादी (अजित पवार गट): १८भाजप: १४राष्ट्रवादी (शरद पवार गट): ११शिवसेना (शिंदे गट): ०३शिवसेना (ठाकरे गट): ०१एमआयएम: ०२काँग्रेस: ०१

English
हिंदी सारांश
Web Title : Beed Election Upset: Parve Wins, Ksheersagar Brothers Suffer Setback

Web Summary : In a stunning Beed election upset, NCP's Premlata Parve defeated the Ksheersagar family's dominance. Parve secured victory by 3,779 votes. The loss is a major blow to BJP's Yogesh and NCP's Sandeep Ksheersagar, ending their long-held control over the municipality.
टॅग्स :Local Body Electionमहाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक निकाल २०२५Municipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूक २०२६Maharashtra Election Resultsमहाराष्ट्र निवडणूक निकाल २०२५