शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

Beed: हरवलेल्या ४ वर्षीय चिमुकल्याचा विहिरीत आढळला मृतदेह; जवळा गावावर शोककळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 17:19 IST

विहिरीच्या कडेला असलेल्या फिरंगी चिंचा खाण्याच्या नादात चिमुकला विहिरीत पडला असावा, असा प्राथमिक संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.

दिंद्रुड (बीड): बीड जिल्ह्याच्या धारूर तालुक्यातील जवळा (परळी पोलीस हद्द) येथे एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. सोमवारी सायंकाळपासून बेपत्ता असलेल्या असेफ समद शेख (वय ४ वर्ष) या चिमुकल्याचा मृतदेह मंगळवारी सकाळी एका विहिरीत आढळून आला. या घटनेमुळे जवळा गावासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

पोलिसांनी रात्रभर राबवले शोधमोहीमअसेफ हा सोमवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घराबाहेर खेळत असताना अचानक बेपत्ता झाला होता. नातेवाईक आणि ग्रामस्थांनी शोध घेऊनही तो न सापडल्याने शिरसाळा पोलिसांनी रात्रभर शोधमोहीम राबवली. मंगळवारी सकाळी सहाय्यक पोलीस निरीक्षक गोरक्षनाथ दहिफळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गावातील पडकी घरे, शाळा आणि विहिरींची तपासणी सुरू केली. यावेळी घरापासून जवळच असलेल्या सुरेश मिसाळ यांच्या शेतातील विहिरीत असेफचा मृतदेह बुडालेल्या अवस्थेत आढळून आला.

चिंचा खाण्याच्या नादात घात?विहिरीच्या कडेला असलेल्या फिरंगी चिंचा खाण्याच्या नादात असेफ विहिरीत पडला असावा, असा प्राथमिक संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. पोलिसांनी मृतदेह बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी धारूर येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवला आहे. खेळत्या-बागळत्या वयातील असेफच्या अशा जाण्याने शेख कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, पालकांनी आपल्या लहान मुलांकडे विशेष लक्ष देण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Beed: 4-Year-Old Boy Found Dead in Well; Village Mourns

Web Summary : A 4-year-old boy, Asef Sheikh, was found dead in a well in Jawala village, Parli Taluka, Beed, after going missing on Monday evening. Police searched overnight. It's suspected he fell in while eating berries. The village is in mourning.
टॅग्स :Beed Crimeबीड क्राईम मराठी बातम्याBeedबीड