शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

बीडच्या मॅग्मो अध्यक्षाच्या कारला अहमदनगरजवळ अपघात; तंत्रज्ञ जागीच ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2022 11:14 IST

जखमींवर नगर येथील जिल्हा रूग्णालय आणि खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत

बीड : येथील महाराष्ट्र शासकीय वैद्यकीय अधिकारी संघटनेचे अध्यक्ष डॉ.मिर्झा बेग यांच्या कारला पुण्याला जाताना अहमदनगरजवळ अपघात झाला. यात एक तंत्रज्ञ जागीच ठार झाला तर दुसरा तंत्रज्ञ व खुद्द अध्यक्ष जखमी झाले आहेत. ही घटना मंगळवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास नगर-पुणे हायवेवर घडली.

दिनेश धोंडरे असे मयत तंत्रज्ञाचे नाव आहे. धाेंडरे हे बीड तालुक्यातील येळंबघाट आरोग्य केंद्रात कार्यरत होते. तसेच मॅग्मोचे अध्यक्ष डॉ.मिर्झा बेग हे राजुरी आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी असून संजय धस हे मलेरिया विभागात कार्यरत आहेत. डॉ.बेग यांच्या पाठिला गंभीर इजा झाली असून धस हे किरकोळ जखमी आहेत. मंगळवारी सकाळीच ते कामानिमित्त पुण्याला जात होते. रस्त्यात टायर फुटल्याने कारने उलटली घेतली. यात धोंडरे जागीच ठार झाले. 

तर जखमींना तात्काळ नगरच्या जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. धस जिल्हा रूग्णालयात तर डॉ.बेग हे एका खाजगी रूग्णालयात उपचार घेत आहेत. ही माहिती समजताच मयत व जखमींच्या नातेवाईकांनी नगरला धाव घेतली. बीडचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अमोल गित्ते, नगरचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संदीप सांगळे यांच्याकडून जखमींना मदत केली जात आहे.

टॅग्स :BeedबीडAccidentअपघातDeathमृत्यू