शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

जरांगे फॅक्टर अन् बीडची निवडणूक; विजयाचा गुलाल उधळताच बजरंग सोनवणे स्पष्टच बोलले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2024 00:59 IST

विजयानंतर बजरंग सोनवणे यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देत जनतेचे आभार मानले आहेत.

Bajrang Sonawane ( Marathi News ) :बीड लोकसभा मतदारसंघात झालेल्या चुरशीच्या लढतीत अखेरच्या क्षणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या बजरंग सोनवणे यांनी बाजी मारली आहे. सोनवणे यांनी भाजपच्या पंकजा मुंडे यांचा जवळपास ७ हजार मतांनी पराभव केला. विविध कारणामुळे निवडणूक काळात राज्यभरात चर्चेचा विषय ठरलेल्या या मतदारसंघाकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं होतं. बीडमध्ये अखेर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची तुतारी वाजली आहे. या विजयानंतर बजरंग सोनवणे यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देत जनतेचे आभार मानले आहेत.

"मला आशीर्वाद देणाऱ्या मतदारसंघातील जनतेचे मी आभार मानतो. बीड जिल्ह्यातील जनता सत्यवादी आहे आणि हा विजय सत्याचा आहे. मला सुरुवातीपासूनच विजयाचा विश्वास होता. त्यामुळेच मी आधीपासून सांगत होतो की ४ जून रोजी बीडचा खासदार बजरंग सोनवणेच होणार. बीडच्या मायबाप जनतेनं एवढ्या धनदांडग्यांविरोधात माझ्यासारख्या गरिबाच्या पोराला निवडून दिलं," अशा शब्दांत बजरंग सोनवणे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

जरांगे फॅक्टरविषयी काय म्हणाले सोनवणे?

जिंकल्यानंतर प्रतिक्रिया देत असताना पत्रकारांनी बजरंग सोनवणे यांना मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाविषयीही प्रश्न विचारला. जरांगे पाटील फॅक्टर तुमच्या मतदारसंघात कामी आला का? या प्रश्नावर बोलताना सोनवणे म्हणाले की, "१०० टक्के हा फॅक्टर कामी आला. मराठा आरक्षण चळवळीचा मला फायदा होईल आणि या आरक्षणाचा प्रश्न मी संसदेत मांडणार, असंच मी सुरुवातीपासून बोलत आहे."

बीडच्या निवडणुकीत नेमकं काय झालं?

मतमोजणी सुरू असताना २४ व्या फेरी अखेर भाजपाच्या पंकजा मुंडे यांना ३० हजार ४६१ मतांची आघाडी होती. मात्र, २५ व्या फेरीपासून ही आघाडी घटू लागली. २५ व्या अखेर २२ हजार ५००, २६ वी फेरी १० हजार २७६ , २७ वी फेरी ७ हजार ४२८ अशी आघाडी कमी होत गेली. तर २८ व्या फेरीत बजरंग सोनवणे यांनी ९३२ मतांची आघाडी घेतली.  त्यानंतर २९ व्या फेरीत १ हजार २१७, ३० वी फेरी २ हजार ६०२ मतांची आघाडी घेतली. मात्र, ३१ व्या फेरीत पुन्हा पारडे फिरले अन् पंकजा मुंडे ४०० मतांनी पुढे आल्या. परंतु, फेरमतमोजणीची मागणी केल्यानंतर झालेल्या मतमोजणीत शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे ७००० मतांनी विजयी झाले.

टॅग्स :beed-pcबीडmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४lok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालbajrang sonwaneबजरंग सोनवणेPankaja Mundeपंकजा मुंडेManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटील