शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

Beed: बिबट्याने दोन घोड्यांसह १६ जनावरांचा पाडला फडशा, दहशतीने गावांत सामसूम

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2025 13:01 IST

डोंगराळ भागात मुक्तसंचार, ग्रामस्थांची उडाली झोप; अंबाजोगाई तालुक्यातील प्रकार

अंबाजोगाई : तालुक्यातील मांडवा पठाण गावात बिबट्याची दोन दिवसांपासून दहशत पसरली आहे. डोंगराळ भागात बिबट्याचा मुक्तसंचार सुरू असून, त्याने दोन गायी, पाच बैल, एक वासरू, तीन वगार, दोन शेळ्या, दोन घोडे आणि एक कुत्रा, अशा तब्बल १६ जनावरांचा फडशा पाडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

बिबट्याच्या दहशतीमुळे रात्रीच्या वेळी गावांमध्ये सामसूम पसरली आहे. ग्रामस्थांची झोप उडाली असून, लहान मुलांना घराबाहेर काढण्यासही पालक घाबरत आहेत. वनविभागाकडे वारंवार तक्रारी करूनही अद्याप ठोस उपाययोजना झाल्या नाहीत, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. बिबट्याला पकडण्यासाठी गावात त्वरित पिंजरे लावण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

या शेतकऱ्यांचे झाले नुकसानया हल्ल्यात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांमध्ये बाबुराव रुद्राक्ष (गाय), बळीराम आकुसकर (दोन बैल), नवनाथ रुद्राक्ष (बैल), संभाजी रुद्राक्ष (गाय), छाया रुद्राक्ष (वासरू), सचिन जोगदंड (शेळी), गणपत जाधव (शेळी), सोमनाथ रुद्राक्ष (वगार), बाजीराव घाडगे (बैल), राहुल जोगदंड (वगार), विनोद जोगदंड (बैल), गणेश इरे (दोन घोडे), नितीन जोगदंड (कुत्रा), आणि चंद्रकांत चौरे (वगार) यांचा समावेश आहे.

टॅग्स :leopardबिबट्याBeedबीडforestजंगल