शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

बीड: करुणा शर्मा यांच्या गाडीवर मध्यरात्री दगडफेक; टायर पंक्चर, दरवाजे उघडण्याचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2023 11:35 IST

शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिंदे सरकारमधील अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांच्याशी संबंधित करुणा शर्मा यांच्या गाडीवर बुधवारी मध्यरात्री त्यांच्या घराजवळ काहीजणांनी हल्ला केला. करुणा यांच्या कारवर दगडफेक करण्यात आली, तसेच त्यांच्या कारचे दरवाजे उघडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करुणा यांनी केला आहे. 

या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. करुणा शर्मा यांच्या गाडीवर बुधवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास तीन अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केली. तसेच दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.  

करुणा शर्मा या शहरातील कॅनॉल रोडवरील उत्तमनगर भागात राहतात. बुधवारी रात्री त्यांच्या गाडीतून पीए अजयकुमार देडे यांच्यासह त्या मेडीकलवर थायरॉईडचे औषध आणण्यासाठी निघाल्या होत्या. घरापासून काही अंतरावर गेल्यानंतर त्यांना लक्षात आले की, गाडीचा टायर पंक्चर आहे. त्यामुळे परत घरी जाण्यासाठी निघाल्या असता तीन अनोळखी व्यक्ती त्या ठिकाणी आले. त्यातील एकाने गाडीच्या समोरील काचेवर दगड मारला, यात काच फुटली. तर अन्य दोघांनी दोन्ही बाजुचे दरवाजे उघडण्याचा प्रयत्न केला, असा आरोप करुणा यांनी केला आहे.   

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडेBeedबीड