शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

घरकुल महाराष्ट्रात, पैसे बिहार-यूपीच्या खात्यात; गरिबांच्या हक्काच्या रकमेवर डल्ला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2026 11:58 IST

बीड घरकुल अपडेट: लाभार्थ्यांचे पैसे परराज्यात गेल्याची ग्रामपंचायत अधिकाऱ्याची कबुली

केज (जि. बीड): तालुक्यातील नांदूरघाट ग्रामपंचायती अंतर्गत मंजूर झालेल्या घरकुल योजनेत एक धक्कादायक गैरप्रकार समोर आला आहे. येथील ९ स्थानिक लाभार्थ्यांच्या हक्काची घरकुलाची रक्कम त्यांच्या खात्यात जमा न होता, चक्क बिहार आणि उत्तर प्रदेशातील व्यक्तींच्या बँक खात्यात जमा झाली आहे. या प्रकरणी दोषींवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्याची मागणी ग्रामपंचायत सदस्य सोनाली अमोल जाधव आणि प्रा. सतीश मोराळे यांनी केली आहे.

मासिक बैठकीत फुटले भांडंशनिवारी (दि. २८) झालेल्या ग्रामपंचायतीच्या मासिक बैठकीत हा मुद्दा उपस्थित करण्यात आला. सन २०२४ मध्ये मंजूर झालेल्या यादीतील ९ लाभार्थी हे परराज्यातील असून त्यांची नावे ना स्थानिक मतदार यादीत आहेत, ना ते येथील रहिवासी आहेत. तरीही त्यांच्या खात्यात पैसे जमा झाल्याचा आरोप सदस्यांनी केला आहे. "स्थानिक गरिबांची फसवणूक करून शासनाचा निधी लाटणाऱ्यांवर कारवाई व्हावी," अशी आक्रमक भूमिका सदस्यांनी घेतली आहे.

ग्रामपंचायत अधिकाऱ्याची कबुलीया संदर्भात ग्रामपंचायत अधिकारी भगवान सिरसट यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले की, "आम्ही स्थानिक लाभार्थ्यांच्या बँक खात्यांसह रीतसर प्रस्ताव पंचायत समितीकडे पाठवले होते. मात्र, तरीही ९ जणांचे हप्ते परराज्यातील लोकांच्या खात्यात जमा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. ही चूक नेमकी कुठे झाली आणि किती रक्कम वर्ग झाली, याची यादी आम्ही पंचायत समितीकडे मागितली आहे."

टेक्निकल एक्सपर्ट करणार चौकशीगटविकास अधिकारी विठ्ठल नागरगोजे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. "रीतसर तक्रार प्राप्त झाल्यानंतर बीड येथील तांत्रिक विभागाच्या 'टेक्निकल एक्सपर्ट'मार्फत या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल आणि दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल," असे त्यांनी स्पष्ट केले.

English
हिंदी सारांश
Web Title : Housing scheme scam: Maharashtra funds diverted to Bihar, UP accounts.

Web Summary : Beed district's housing scheme funds meant for locals were wrongly deposited into Bihar and UP bank accounts. An investigation is underway to identify those responsible for this fraud and ensure accountability.
टॅग्स :Beed Crimeबीड क्राईम मराठी बातम्याfraudधोकेबाजी