शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

Beed: अभिलेखे कक्षाचे प्रमुख एसीबीच्या रडारवर; सफाई कामगाराकडे जबाबदारी कशी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 18:02 IST

बीड पालिका लाच प्रकरणात 'ट्विस्ट'; 'काळे' कारनाम्यांसाठी विभाग प्रमुख अडचणीत

बीड : बीड नगर पालिकेमध्ये गुंठेवारीची सत्यप्रत देण्यासाठी सफाई कामगार आशिष मस्के याला १ हजार रुपयांची लाच घेताना एसीबीने मंगळवारी रंगेहाथ पकडले. या कारवाईत रात्री उशिरा आणखी एक मोठा ट्विस्ट आला आहे. मस्के याच्यासोबत लाच घेण्यासाठी प्रोत्साहन दिल्याबद्दल पाबळे नामक खासगी व्यक्तीला सहआरोपी करण्यात आले असून, तो सध्या फरार आहे.

या कारवाईतील सर्वात मोठा प्रश्न म्हणजे, सफाई कामगार असलेल्या आशिष मस्के याच्याकडे कसलेही अधिकृत आदेश नसताना त्याला पालिका अभिलेखे कक्षात कामाची जबाबदारी कशी देण्यात आली? राजकीय व्यक्तींच्या आशीर्वादाने आणि काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अर्थपूर्ण सहकार्यानेच तो या कक्षात कार्यरत होता. त्यामुळे, ज्या विभागप्रमुखाने आदेश नसतानाही कामगाराला ही जबाबदारी दिली, ते आता थेट एसीबीच्या रडारवर आले आहेत.

'काळे' कारनाम्यांना जबाबदार कोण?अभिलेखे कक्षात यापूर्वीही पैशांसाठी अनेकदा लोकांची अडवणूक झाल्याचे आरोप आहेत. या विभागात एवढे 'काळे' कारनामे सुरू असतानाही आणि कामगारासारखा व्यक्ती लाचखोरीतून 'चंद्रा'वर पोहोचलेला असताना, त्याकडे कोणी दुर्लक्ष केले, असा सवाल उपस्थित होत आहे. आता या लाचेच्या कारवाईत आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास एसीबीकडून केला जाणार असून, विभागप्रमुखांसह सत्यप्रतवर सह्या करणारे अधिकारीही अडचणीत आले आहेत.

अविनाश धांडे आत्महत्येचे प्रकरण शांतयाच पालिकेतील वसुली विभागातील कर्मचारी अविनाश धांडे यांनी आत्महत्या केल्यानंतर, मृत्यूपूर्वी त्यांनी आरोप केलेल्या व्यक्तींची अद्यापही पोलिसांनी चौकशी केलेली नाही. या आरोपींना 'लाख'मोलाचे सहकार्य करण्यासाठी काही राजकीय व्यक्ती धावपळ करत असल्याची सूत्रांची माहिती आहे. बीड शहर पोलीस मात्र या प्रकरणावर मौन बाळगून आहेत.

एकजण फरारआशिष मस्के सोबत पाबळे नामक खासगी व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे. त्याने लाचेसाठी प्रोत्साहन दिले असून, तो सध्या फरार आहे. या प्रकरणात तपासात ज्यांच्यावर संशय वाटेल, त्यांना चौकशीसाठी बोलावले जाईल.- सोपान चिट्टमपल्ले, उपअधीक्षक एसीबी बीड

English
हिंदी सारांश
Web Title : Beed Municipality Clerk Busted for Bribery; Senior Officials Under Scrutiny

Web Summary : A Beed municipality worker was caught taking a bribe. Questions arise about his unauthorized role in the records department, implicating senior officials. A private individual is also implicated. An investigation into prior misconduct is ongoing, raising concerns about a previous suicide case and lack of police action.
टॅग्स :Beed Crimeबीड क्राईम मराठी बातम्याBeedबीड