शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

बीडमध्ये हद्दपार जुगाऱ्याने पोलिसांना चकवले; आठ वर्षानंतर प्रकार आला चव्हाट्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2019 16:41 IST

हद्दपार असतानाही बीड जिल्ह्यात खुलेआम वावर

बीड : माजलगाव शहरात जुगार चालविणाऱ्याने चक्क पोलिसांनाच घुमविल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी सायंकाळी समोर आला आहे. खोटे नाव सांगून आठ वर्षांपासून तो शहरात वावरत आहे. हद्दपार असतानाही शहरात वावरताना आढळल्याने विशेष पथकाने कारवाई केली. चौकशी केल्यानंतर हा खोटा प्रकार चव्हाट्यावर आला. त्यानंतर त्याच्यावर माजलगाव शहर ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, आठ वर्षांपासून आरोपी खोटे नाव सांगत असतानाही माजलगाव पोलिसांना याचा थांगपत्ता नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. 

मधुसुदन प्रभाकर डोळ (४८ रा.माजलगाव) असे त्या फसवणूक करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. मधुसदनने संजय नावाचे खोटे मतदान कार्ड तयार करून घेतले. तो जुगारी गुन्हे करण्याच्या वृत्तीचा आहे. २००८ साली त्याच्यावर माजलगाव शहर ठाण्यात पहिला गुन्हा नोंद झाला. तेव्हाही त्याने आपण संजय प्रभाकर डोळ असे असल्याचे पोलिसांना सांगितले. त्यानंतर त्याच्यावर २०१५ पर्यंत विविध असे ७ गुन्हे दाखल झाले. गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याने त्याचा हद्दपारीचा प्रस्ताव तयार केला. उपविभागीय अधिकाऱ्यांनी त्याची पार्श्वभूमि तपासून त्याला २ फेब्रुवारी २०१७ साली बीड जिल्ह्यातून दोन वर्षासाठी हद्दपार करण्याचे आदेश दिले. मे महिन्यात हा आदेश डोळ याला तामील करण्यात आला. विशेष म्हणजे यावेळीही त्याचे नाव संजय असेच होते. मधुसुदनचा उल्लेख कोठेही नव्हता.

दरम्यान, हद्दपार असतानाही डोळ हा माजलगाव शहरात वावरत असल्याची माहिती मिळाल्यावरून विशेष पथकाचे प्रमुख पोउपनि रामकृृष्ण सागडे यांनी मंगळवारी शहरात सापळा लावला. गणेश नवले, अंकुश वरपे, पांडुरंग देवकते, रेवननाथ दुधाने, जयराम उबे यांनी त्याला दुपारच्या सुमारास ताब्यात घेतले. यावेळी त्याने आपण संजय नसून मधुसुदन असल्याचे सांगितले. संजय हा कोल्हापूरला असल्याचे सांगितले. सागडे यांनी विश्वासात घेऊन उलट तपासणी केली असता त्याने सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर त्याचा अहवाल तयार करून शहर पोलिसांना दिला. त्यावरून पोउपनि रमेश जाधवर यांच्या फिर्यादीवरून डोळवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. पोनि सय्यद सुलेमान यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि बिराजदार हे तपास करीत आहेत. 

चौकशीनंतर पुढील कारवाई करण्यात येईल हद्दपार केलेल्या आरोपी जिल्ह्यात वावरत असताना कारवाईचे आदेश आल्याने माजलगावात एकाला ताब्यात घेतले. त्याच्या जवळ आढळलेल्या कागदपत्रांवरून तो खोटे बोलत असल्याचे समोर आले. याचा अहवाल तयार करून कारवाईस्तव माजलगाव शहर पोलिसांना दिला आहे. चौकशी करून पुढील कारवाई ते करतील. याबाबत पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांना कळविले आहे.- रामकृष्ण सागडे, प्रमुख, विशेष पथक बीड जिल्हा

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसBeedबीड