शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

Beed: माजलगाव तालुक्यात अनेक गावे पाण्याखाली, एनडीआरएफने केली गर्भवतीची सुटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2025 13:30 IST

माजलगाव तालुक्यातील अनेक गावांना पुराच्या पाण्याने वेढले; एनडीआरएफचे जवान मदतीसाठी धावले

- पुरूषोत्तम करवा माजलगाव ( बीड) : पैठण येथील नाथसागर व माजलगाव येथील माजलगाव धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग चालू असल्याने माजलगाव तालुक्यातील अनेक गावांना पुराच्या

पाण्याने वेढले आहे.सांडस चिंचोली व डेपेगाव या गावातील नागरिकांना सुरक्षित स्थळी नेण्यासाठी एनडीआरएफच्या जवानांना तैनात करण्यात आली आहे. यात बरोबर तालुक्यातील अनेक गावांना पाण्याचा वेडा असल्याने त्या गावचा अनेक गावांची संपर्क तुटला आहे.

माजलगाव धरणातून सोमवारी वरपासून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू होता परंतु धरणाच्या वरील भागात झालेल्या मोठ्या पावसामुळे धरणात मोठ्या प्रमाणात आवक येऊ लागल्याने सोमवारी रात्री 1 लाख 15 हजार क्युसेक्स एवढे पाणी सोडण्यात आलेले असल्याने सिंदफणा नदीवरील जुन्या पुलावरून पाणी गेले. त्याचबरोबर गोदावरी नदी पात्राला मोठ्या प्रमाणात पूर आल्याने व मंजरथ या ठिकाणी गोदावरी व सिंदफनाचा त्रिवेणी संगम असल्याने गोदावरी नदीतील पाणी सिंदफनाच्या पाण्याला आत मध्ये लवकर येऊन देत नसल्यामुळे सिंदफनाचे पाणी मोठ्या प्रमाणात दुर दुर पसरले आहे यामुळे अनेकांच्या शेतात पाणी गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. 

तालुक्यातील सांडस चिंचोली, डेपेगाव या गावात मोठ्या प्रमाणात पुराचे पाणी घुसल्याने एनडीआरएफच्या जवानांना पाचरण करण्यात आले. मंगळवारी सकाळपासून नागरिकांना बाहेर काढण्याचे काम जवान करत आहेत. चिंचोली येथील एका महिलेला प्रस्तुतीसाठी माजलगावकडे आणण्यासाठी एनडीआरएफच्या जवानांची मदत घेण्यात आली.  त्या महिलेस रुग्णालयात सुरक्षितपणे पाठवण्यात आले. त्याचबरोबर मोगरा येथील पुलावरून पाणी गेल्याने अनेक गावचा संपर्क तुटला आहे तसेच सरस्वती नदीला पूर आल्याने  डाकेप्रिप्री ,मोगरा ,पोहनेर , साळेगाव ,  कोथाळा , खतगव्हाण , डिग्रस आदि गावांचा इतर गावांशी संपर्क तुटला आहे.

माजलगाव ते परतुर रस्त्यावर असलेल्या सावंगी येथील पुलावरून गोदावरीचे पाणी वाहत आहे. यामुळे कालपासून हा रस्ता बंद आहे. त्यामुळे अनेकांचा संपर्क तुटला आहे. त्याचबरोबर गोदावरी नदीकाठच्या अनेक गावात पाणी घुसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

टॅग्स :RainपाऊसfloodपूरBeedबीडMajalgaon Damमाजलगाव धरण