शहरं
Join us  
Trending Stories
1
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
2
Nimisha Priya : केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द; भारताच्या मुत्सद्देगिरीला अखेर यश
3
खेकड्यांनी धरण पोखरल्यानंतर आता नवा शोध! मंत्री म्हणतात, ४००० टन कोळसा पावसात वाहून गेला...
4
राज्यात नव्या राजकीय समीकरणाची नांदी; शेकापच्या कार्यकर्त्यांना राज ठाकरे करणार मार्गदर्शन
5
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
6
आजचे राशीभविष्य २९ जुलै २०२५ : आर्थिक लाभाचे योग, नोकरीत वरिष्ठ देखील खुश होतील
7
समाज माध्यमांत राज्य सरकारवर टीका केल्यास कर्मचाऱ्यांवर ‘शिस्तभंग’; परिपत्रक जारी
8
पहलगाम मास्टरमाइंडसह तिघांचा खात्मा; ‘ऑपरेशन महादेव’ने दहशतवाद्यांची कोंडी, ‘असा’ लागला छडा
9
...तर सत्ताकांक्षी भाजपा भविष्यहीन पक्ष बनेल; आता योद्धे हवेत, भाड्याचे तट्टू कामाचे नाहीत!
10
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
11
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
12
नागपूरची १९ वर्षीय दिव्या देशमुख दिग्गज कोनेरू हम्पीला पराभूत करत झाली विश्वविजेती
13
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश
14
निशिकांत दुबेंना जाब विचारणाऱ्यांचे राज ठाकरेंनी मानले आभार; काँग्रेस खासदारांचे केले कौतुक
15
५ वर्षांत २,०९४ विमाने बिघाडली, प्रवाशांना टेन्शन; १८३ तांत्रिक बिघाड, सरकार काय करतेय?
16
नाव ‘डॉग बाबू’, वडिलांचे नाव ‘कुत्ता बाबू’, आईचे नाव ‘कुतिया देवी’; बिहार प्रशासनाचे देशभर वाभाडे
17
संजय राऊत मानहानी प्रकरण: नितेश राणेंविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द; कोर्टासमोर हजर होणार
18
नालेसफाईतील घोटाळेबाजांना १५ कोटींचा दंड; ‘लोकमत’च्या स्टिंग ऑपरेशननंतर कारवाईला आणखी वेग
19
काय गडबड आहे? विद्यार्थी जीवन का संपवत आहेत? न्यायालयाकडून प्रश्न; म्हटले, वेगाने तपास करा
20
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!

बीडचे जिल्हा शल्य चिकित्सक अशोक थोरातांचे निलंबन होणार रद्द; अजित पवारांचे सुतोवाच...

By सोमनाथ खताळ | Updated: April 2, 2025 13:03 IST

केजच्या आ.नमिता मुंदडा यांनी मांडलेल्या लक्षवेधीस उत्तर देताना आरोग्यमंत्री प्रकाश आबीटकर यांनी डॉ.थोरात यांच्यावर अधिवेशनात निलंबनाची घोषणा केली होती.

बीड : कोरोना काळात घोटाळा केल्याचा ठपका ठेवत बीडचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांच्या निलंबनाची घोषणा अर्थसंकल्पीय अधिवेशनात आरोग्य मंत्री प्रकाश आबीटकर यांनी केली होती. परंतू हे निलंबण चुकीचे असून ते मागे घ्यावे, अशी मागणी आंदोलन करून बीडकरांनी केली होती. हीच माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही मिळाली. यावर चुकीचा निर्णय घेऊन कोणावर अन्याय झाला असेल तर असा निर्णय रद्द करण्यात येईल, असे सुतोवाच त्यांनी केले आहे.

कोरोना काळातील पहिल्या लाटेत डॉ. अशोक थोरात हे जिल्हा शल्य चिकित्सक होते. त्यानंतर डॉ. सूर्यकांत गित्ते, डॉ.सुरेश साबळे, डॉ.अशोक बडे आदींच्या नियूक्त्या झाल्या. सहा महिन्यापूर्वी डाॅ.थोरात पुन्हा जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून आले. त्यानंतर शासकीय रूग्णालयातील प्रसूतीचा टक्का आणि शस्त्रक्रीयांचा आकडाही वाढला होता. सामान्य रूग्णांना तत्पर व दर्जेदार सेवा मिळू लागल्या होत्या, असे असतानाच त्यांच्याविरोधात केजच्या आ.नमिता मुंदडा यांनी लक्षवेधी मांडत डॉ.थोरात यांच्यावर कारवाईची मागणी केली. त्यावरून आरोग्यमंत्री प्रकाश आबीटकर यांनी अधिवेशनात निलंबनाची घोषणा केली होती. परंतू, अद्यापही निलंबन आदेश आलेला नाही. तर हे निलंबन मागे घ्यावे, यासाठी बीडमध्ये आंदोलन करण्यात आले. 

दरम्यान, आज, बुधवारी उपमुख्यमंत्री अजित पवार हे बीडमध्ये आले असता त्यांनाही यासंदर्भात निवेदने देण्यात आली. यावर उपमुख्यंत्री अजित पवार यांनी यावर भाष्य केले. जे अधिकारी चांगले काम करत नाहीत, अशांना मी सोडणार नाही. परंतू बीडमधीलच एका अधिकाऱ्याचे चुकीच्या पद्धतीने निलंबन झाल्याची माहिती मला दिली आहे. परंतू असे झाले असेल तर कोणावरही अन्याय होणार नाही, याची काळजी घेऊ, असे सुतोवाच करत पवार यांनी निलंबण मागे घेण्याच्या मागणीला एकप्रकारे हिरवा झेंडा दाखविला आहे. त्यामुळे डॉ.थोरात हेच पुन्हा जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून कायम राहतील, अशा अपेक्षा बीडकरांना आहेत.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारBeedबीड