शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

गुन्हेगारांचा नव्हे, तर गुणवंतांची खाण असणारा बीड जिल्हा; युपीएससीत दोघांनी मारली बाजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2025 12:01 IST

बीडला बिहार असे संबोधले, तर कोणी बीडला गुन्हेगारांचा जिल्हा म्हटले. परंतु, याच जिल्ह्यातील तरुणांनी लोकसेवा आयोगासारख्या सर्वोच्च परीक्षांचा डोंगर सर केला आहे.

- सोमनाथ खताळ 

बीड : स्व. संतोष देशमुख हत्या प्रकरण, माजलगावातील दिवसाढवळ्या खून, छेडछाड, अत्याचार, हाणामाऱ्या, आदी घटना मागील काही दिवसांत जिल्ह्यात वाढल्याचा दावा राजकीय नेत्यांसह इतरांनी केल्याने बीडचे नाव देशभरात चर्चेत आले. बीडला बिहार असे संबोधले, तर कोणी बीडला गुन्हेगारांचा जिल्हा म्हटले. परंतु, याच जिल्ह्यातील तरुणांनी लोकसेवा आयोगासारख्या सर्वोच्च परीक्षांचा डोंगर सर केला आहे. दोघांनी यश मिळविल्याने बीड जिल्हा हा गुन्हेगारांचा नव्हे, तर गुणवंतांची खाण असलेला जिल्हा म्हणून ओळख होत आहे. यापूर्वीही अनेकांनी युपीएससीत यश मिळवून जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.

१ - डॉ. अक्षय संभाजी मुंडे, परळीरँक - ६९९परळी तालुक्यातील पांगरी गावातील सामान्य कुटुंबात जन्म झाला. लहानपणीच पितृछत्र हरवले. आई इंदुबाई मुंडे या शेतात काम करतात. निरक्षर असतानाही आईने मुलाला शिकवले. त्याचे चीज आता अक्षय यांनी करून दाखवले आहे. लातूरला बीडीएसचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर अभ्यासासाठी पुणे गाठले, तेथून पुन्हा दिल्लीला उड्डाण घेतले. आईसोबतच बहीण अक्षता यांचीही खूप मदत झाली. जिद्दीने यश मिळविल्याचे अक्षय सांगतात.

२ - डॉ. पंकज नारायण आवटे, पाटोदारँक - ६५३पाटोदा तालुक्यातील नायगाव हे डाॅ. पंकज यांचे गाव. वडील नारायण हे निवृत्त फौजी, तर आई पंचफुला या गृहिणी. भाऊ शैलेंद्र हा सहायक पोलिस निरीक्षक असून, बहीण वर्षा या आयटी क्षेत्रात नोकरी करत असून, त्यांचाही यशात वाटा आहे. २०१८-१९ साली गडचिरोली जिल्ह्यात प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून वर्षभर सेवा दिली. नंतर दिल्लीला जाऊन अभ्यास केला. जिद्द आणि चिकाटीच्या बळावर आज पंकज यांनी यश संपादन केले आहे.

टॅग्स :upscकेंद्रीय लोकसेवा आयोगBeedबीडMarathwadaमराठवाडा