शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

बीड जिल्ह्यात करोडोंचा गंडा घालणारे मोकाटच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 01:17 IST

बीड : जादा व्याजदराचे आमिष दाखवून करोडो रूपयांचा गंडा घालणाऱ्या माजलगावच्या परिवर्तन आणि कळंबच्या शुभकल्याण मल्टीस्टेवर जिल्हाभर विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले. दोन महिन्यांचा कालावधी उलटूनही अद्याप यातील एकाही आरोपीला शोधण्यात आर्थिक गुन्हे शाखेला यश आलेले नाही. यावरून या मल्टीस्टेटच्या संचालक मंडळाला ‘अर्थ’पूर्ण सहकार्य केले जात असल्याचा आरोप सर्वसामान्यांमधून ...

ठळक मुद्देशुभकल्याण व परिवर्तन मल्टीस्टचे संचालक मंडळ सापडेना

बीड : जादा व्याजदराचे आमिष दाखवून करोडो रूपयांचा गंडा घालणाऱ्या माजलगावच्या परिवर्तन आणि कळंबच्या शुभकल्याण मल्टीस्टेवर जिल्हाभर विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले. दोन महिन्यांचा कालावधी उलटूनही अद्याप यातील एकाही आरोपीला शोधण्यात आर्थिक गुन्हे शाखेला यश आलेले नाही. यावरून या मल्टीस्टेटच्या संचालक मंडळाला ‘अर्थ’पूर्ण सहकार्य केले जात असल्याचा आरोप सर्वसामान्यांमधून केला जात आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील वरपगाव येथे शुभकल्याण मल्टीस्टेटची मुख्य शाखा आहे. दिलीप आपेट हे त्याचे अध्यक्ष. जिल्ह्यातील शेकडो ठेवीदारांना जादा व्याजदराचे आमिष दाखवून मोठी गुंतवणूक करुन घेतली. त्यानंतर अध्यक्षांसह संचालक मंडळाने धूम ठोकली. ठेवीदारांनी संबंधित शाखांकडे विचारणा केली असता त्यांना उडवाउडवीची उत्तरे मिळाली. शेवटी संतप्त ठेवीदारांनी पोलीस ठाणे गाठून अध्यक्षासह संचालक मंडळाविरुद्ध फसवणुकीची फिर्याद दिली. आतापर्यंत बीडसह अंबाजोगाई, केज, नेकनूर, माजलगाव, परळी, गेवराई, वडवणी, आष्टी, धारुर येथील पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत.

यामध्ये दिलीप आपेटसह भास्कर शिंदे, अजय आपेट, नागिनी शिंदे, विजय आपेट, कमलाबाई नखाते, शालिनी आपेट, अभिजित आपेट, प्रतिभा आंधळे, आशा बिरादार, बाबूराव सोनकांबळे या संचालकांसह शाखाधिकारी व इतर कर्मचाºयांचा आरोपींत समावेश आहे.

अशीच काहीशी परिस्थिती माजलगाव येथील परिवर्तन मल्टीस्टेटची आहे. भारत मरिबा अलझेंडे याने ही शाखा मल्टीस्टेट उभारली. बीड जिल्ह्यात विविध ठिकाणी शाखा उभारून नागरिकांना जादा व्याजदराचे आमिष दाखविले. परंतु रक्कम परत मिळत नसल्याने गुंतवणुकदार मेटाकुटीस आले होते. अखेर माजलगाव येथील ठेवीदारांनी पोलीस ठाणे गाठून मल्टीस्टेटविरोधात फिर्याद दिली.

त्याप्रमाणे मल्टीस्टेटचा अध्यक्ष भारत अलझेंडे, उपाध्यक्ष संजय बाबुलालजी शर्मा यांच्यासह ज्योती टाकणखार, शेख फरीदा सुलताना शेख मजहर, सुशिला अलझेंडे, शुभांगी लोखंडे, उद्धव जाधव, अर्जून होके, शहाजी शिंंदे, अनिता प्रधान, विनोदकुमार जाजू, धर्मराज भिसे, सुरेखा खडके या संचालक मंडळावर गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर जिल्ह्यात विविध पोलीस ठाण्यात परिवर्तनविरोधात गुन्हे दाखल होण्याची मालिका सुरू झाली.हक्काचा अधिकारी नसल्याने अडचणआर्थिक गुन्हे शाखेकडे सद्यस्थितीत जवळपास २२ तपास आहेत. गुन्ह्यांची संख्या पाहता आणि तपासाची किचकट प्रक्रिया पाहता येथे मनुष्यबळ अपुरे आहे. त्यातच गुन्हे शाखेचे पोलीस उपअधीक्षक भारत गाडे हे अनेक महिन्यांपासून रजेवर आहेत. काही काळ सपोनि मारूती शेळके यांनी ही शाखा सांभाळली. परंतु त्यांना याचा तपास लावण्यात अपयश आले. आता पोलीस निरीक्षक प्रशांत शिंदेसह एक सपोनि व पोलीस उपनिरीक्षक या शाखेत नव्याने रूजू झाले आहेत. त्यांना या गुन्ह्यांचा अभ्यास करून तात्काळ तपास पूर्ण करण्याचे आव्हान आहे.

ठेवीदारांमध्ये पोलिसांबद्दल संतापगुन्हे दाखल होऊन दोन महिन्यांचा कालावधी उलटला तरी पोलिसांकडून अद्याप समाधानकारक तपास करण्यात आलेला नाही. त्यामुळे ठेवीदांरामधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.४संचालक मंडळाला पोलीस पाठिशी घालत असल्याचा अरोपही काही ठेविदारांनी केल्याचे सूत्रांकडून समजते. तसेच अनेकवेळा ठेवीदार पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी यांना भेटलेही आहेत. परंतु याचा काहीच फायदा झाला नसून तपास पुढे सरकलेला नाही.

संचालकांना पाठबळसुतावरून स्वर्ग गाठणाºया पोलिसांना अद्याप या दोन्ही मल्टीस्टेटमधील एकाही संचालकाला अटक करण्यात यश आलेले नाही. आर्थिक गुन्हे शाखेच्या तत्कालीन अधिकाºयांकडून त्यांना पाठबळ मिळत असल्याचे सांगण्यात येत आहे. जर असे नाही तर एवढ्या दिवस आरोपींना अटक का केली नाही, असा सवालही ठेवीदारांनी केला आहे.

टॅग्स :BeedबीडCrimeगुन्हाMarathwadaमराठवाडा