शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
2
नेपाळच्या माजी पंतप्रधानांना पत्नीसह बेदम मारले; जमावाच्या तावडीतून सैन्यानं कसं वाचवले?
3
जीएसटी कपातीच्या तोंडावर TVS NTORQ 150 लाँच; नव्या रुपात आली हायपर स्पोर्ट्स स्कूटर
4
'हॉटेल जाळले, लोक पर्यटकांनाही सोडत नाहीत'; नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीय महिलेने सांगितली आपबिती
5
फेसबुक, इन्स्टाग्राम की ट्विटर सर्वाधिक कमाई नेमकी कुठून होते? जाणून घ्या सविस्तर
6
चीन अन् पाकसह भारतीय सैन्यही बेलारूसला पोहचले; रशियाच्या खेळीनं NATO देशांची धडधड वाढली, कारण...
7
आलिशान कार, ३२ किलो सोन्या-चांदीची बिस्किटं, दागिने; काँग्रेस आमदाराकडे कोट्यवधींचं घबाड
8
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, देशभरातून ९ संशयित ISIS दहशतवादी ताब्यात!
9
पोलिसांना पाहताच उठून उभा राहिला पाण्यात पडलेला मृतदेह, व्हिडीओ काढणारे झाले अवाक्
10
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी ९० मिनिटांसाठी बंद राहणार UPI सेवा, जाणून घ्या
11
दुधाचे भाव कमी होणार! अमूल-मदर डेअरीचे दूध किती रुपयांनी स्वस्त होणार? कंपनीकडून निर्णयाचं स्वागत
12
राहा फिट! वेट लॉससाठी व्हायरल होतंय ६-६-६ वॉकिंग चॅलेंज; बारीक होण्याचा सुपरहिट फॉर्म्युला?
13
भुजबळ म्हणाले, "हैदराबाद गॅझेटचा जीआर रद्द करा", विखे पाटलांनी दिलं उत्तर, म्हणाले "रद्द करण्याची गरज नाही"
14
वीज बिलाची चिंता सोडा, पिकांना भरपूर पाणी द्या; उपसा योजनांच्या वीज सवलतीस २ वर्षे मुदतवाढ
15
बाप बडा न भैया, सबसे बडा रुपैया! जमिनीच्या वाटणीसाठी मृतदेह २ दिवस ठेवला घरात
16
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! "तो जिवंत आहे की मेला?", राजा रघुवंशीचा काटा काढल्यावर पत्नीने विचारलेला प्रश्न
17
समृद्धी महामार्गावर खिळे ठोकून दुरुस्ती की घातपाताचा प्रयत्न? अनेक वाहने पंक्चर, प्रवासी संतप्त
18
पितृपक्ष 2025: श्राद्धाचा नैवेद्य ठेवताना डावीकडून उजवीकडे पाणी फिरवतात; का ते माहितीय का?
19
गेली कबुतरे कुणीकडे? दाणे विक्रेत्यांनीही गाशा गुंडाळला; दादरचा कबुतरखाना पूर्णपणे बंद
20
नवी मुंबईतील 'त्या' बांधकामांना 'ओसी' देऊ नये; विधान परिषद सभापतींचे आदेश

बीड सायबर पोलिसांची गुजरातमध्ये करोडोंची डील; पीएसआयनंतर हवालदार, चालकही निलंबित

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 11:54 IST

एकाच पोलिस ठाण्यातील तिघांना निलंबित करून पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांनी चुकीचे काम करणाऱ्यांना दणका दिला आहे.

बीड : परवानगी न घेता आरोपी घेऊन गुजरातमध्ये गेले. तेथे गेल्यावर कोट्यवधी रुपयांची डील केल्याचा आरोप झाला. प्राथमिक चाैकशीत दोषी आढळल्याने सायबर पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक रणजीत कासले यांचे निलंबन झाले होते. आता त्यांच्यासोबत गेलेले हवालदार रामदास गिरी आणि चालक बळीराम भाग्यवंत यांनाही बुधवारी निलंबित करण्यात आले आहे. एकाच पोलिस ठाण्यातील तिघांना निलंबित करून पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांनी चुकीचे काम करणाऱ्यांना दणका दिला आहे. यामुळे ठाणेदारही अडचणीत आले असून, कारवाईची टांगती तलवार त्यांच्यावर आहे.

सायबर पोलिस ठाण्यात २०२४ मध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. त्याचा तपास पोलिस निरीक्षक देविदास गात यांच्याकडे होता. त्यात एक आरोपी अटक केला. त्याची पोलिस कोठडी घेण्यात आली होती, परंतु याच पोलिस ठाण्यातील उपनिरीक्षक रणजीत कासले, हवालदार रामदास गिरी आणि चालक बळीराम भाग्यवंत हे तिघे जण खासगी वाहनाने या आरोपीला घेऊन गुजरात राज्यात गेले. त्या आधी त्यांनी पोलिस अधीक्षक नवनीत काँवत अथवा छत्रपती संभाजीनगरचे विशेष पोलिस महानिरीक्षक विरेंद्र मिश्र यांची परवानगी घेतली नाही. त्यानंतर गुजरातमध्ये गेल्यानंतरही त्यांनी एका व्यक्तीकडे पैशांची मागणी केली. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या प्रकरणात पोलिस अधीक्षक काँवत, अपर अधीक्षक सचिन पांडकर यांनी चौकशी करून कासले यांना तडकाफडकी निलंबित केले होते, तर गिरी आणि चालक भाग्यवंत यांची चौकशी केजचे सहायक अधीक्षक कमलेश मिना यांच्याकडे सुरू होती. त्याचा अहवाल प्राप्त होताच बुधवारी या दोघांचेही निलंबन करण्यात आले.

खासगी वाहनातून आरोपी गुजरातमध्येकासले यांच्यासह गिरी, भाग्यवंत यांनी शासकीय ऐवजी खासकी वाहन गुजरातमध्ये नेले. भाग्यवंत हे सुट्टीवर होते. तसेच, सायबर पोलिस ठाण्यात वाहन नसतानाही त्यांची पोस्टींग तेथेच होती. तर, गिरी हे देखील एका ठिकाणी युनिफॉर्मवर बैठकीत बसल्याचे दिसले. हे सर्व पुरावे पाहून आणि चौकशीतील मुद्द्यांवरून काँवत यांनी गिरी व भाग्यवंत यांनाही निलंबित केले.

कासलेंचे व्हिडीओ अन् पोलिसांची बदनामनिलंबित केल्यानंतर रणजीत कासले यांनी काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केले. यात अनेकांवर आरोप केले. आता देखील त्यांचे व्हिडीओ सुरूच आहेत. त्यामुळे राज्यभरात पुन्हा एकदा बीड पोलिसांची प्रतिमा मलीन झाली आहे.

पोलिस निरीक्षकही अडचणीतसायबर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक देविदास गात यांचीही चौकशी झाली आहे. त्यांचाही कसुरी अहवाल पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांनी विशेष पाेलिस महानिरीक्षक यांच्याकडे पाठविला आहे. त्यामुळे त्यांच्यावरही कारवाईची टांगती तलवार आहे. त्यांच्यावरही गंभीर आरोप असल्याचे सूत्रांनी सांगितले जात आहे. आता आयजी हे गात यांच्यावर कारवाई करतात की पाठीशी घालतात? याकडे लक्ष लागले आहे.

सायबर ठाणेदारही बदलणार ?पोलिस ठाण्यातील कर्मचारी दोषी आढळला, तर ठाणेदाराला जबाबदार धरून कारवाई करणार, असे पोलिस अधीक्षक काँवत यांनी सुरुवातीलाच सांगितले होते. आता या प्रकरणात एका पीएसआयसह दोन कर्मचारी दोषी आढळले आहेत. त्यामुळे गात यांच्यावर काय कारवाई होते, याकडे लक्ष लागले आहे. गात यांना नियंत्रण कक्षात घेतले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. बुधवारी दुपारपर्यंत तसे आदेश निघाले नव्हते.

कारवाई होणारचसायबर पोलिस ठाण्यातील दोन कर्मचारी निलंबित केले आहेत, तसेच पोलिस निरीक्षक यांचाही कसुरी अहवाल विशेष पोलिस महानिरीक्षक यांना पाठवला आहे. चुकीचे काम करणाऱ्यांवर कारवाई होणारच आहे. चांगले काम करणाऱ्यांना माझे पाठबळ असेल.- नवनीत काँवत, पोलिस अधीक्षक बीड

टॅग्स :Beedबीडcyber crimeसायबर क्राइमsuspensionनिलंबनBeed Crimeबीड क्राईम मराठी बातम्या