- मधुकर सिरसटकेज (बीड): बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात एका अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा अत्यंत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गावातील एका १६ वर्षीय ऊसतोड मजुराने १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण केले इतकेच नव्हे, तर चक्क तिच्या पित्याला फोन करून मुलीचे अपहरण केल्याची माहिती दिली. या थरारक 'सिनेमा स्टाईल' घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
केज तालुक्यातील एका खेडेगावातील अल्पवयीन मुलीचे वडील ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनावर चालक म्हणून काम करतात. शनिवार, दि. १ नोव्हेंबर रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास ही १५ वर्षीय मुलगी बेपत्ता झाली. मुलीच्या आई-वडिलांनी रात्री उशिरापर्यंत सर्व नातेवाईकांकडे तिचा शोध घेतला, पण ती कुठेही आढळली नाही.
वडिलांना थेट फोनवरून आव्हानरविवार, दि. २ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास मुलीचे वडील केज येथे पाहुण्यांकडे मुलीचा शोध घेत असतानाच, गावातील ऊसतोड मजुरीचे काम करणाऱ्या अविवाहित तरुणाने त्यांना त्यांच्या मोबाईलवर कॉल केला. आरोपीने अत्यंत बेधडकपणे सांगितले, "तुमची मुलगी माझ्यासोबत आहे!" यावर मुलीच्या पित्याने घाबरून, "गुपचूप माझ्या मुलीला घरी आणून सोड," अशी विनवणी केली. मात्र, आरोपी तरुणाने मुलीला कुटुंबाच्या ताब्यात देण्यास नकार दिला. या घटनेमुळे मुलीच्या वडिलांनी तातडीने रविवारी (दि. २) केज पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांकडून तातडीने तपास सुरूअल्पवयीन मुलीचे अपहरण करणाऱ्या आरोपी तरुणाविरुद्ध केज पोलिसात गुन्हा (अपहरण, कलम ३६३) नोंद करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक उमेश निकम हे अल्पवयीन मुलीचा आणि आरोपी तरुणाचा शोध घेत आहेत.
Web Summary : A shocking abduction in Beed: a 16-year-old sugarcane worker kidnapped a 15-year-old girl and brazenly called her father to announce it. Police are searching for the girl and the suspect after the father filed a complaint.
Web Summary : बीड में सनसनीखेज अपहरण: 16 वर्षीय गन्ना मजदूर ने 15 वर्षीय लड़की का अपहरण किया और उसके पिता को फोन करके बताया। पिता की शिकायत के बाद पुलिस लड़की और संदिग्ध की तलाश कर रही है।