शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

Beed Crime: सहावीत शिकणाऱ्या मुलीवर अत्याचार; भीतीपोटी बापाने तिचे शिक्षणच केले बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2025 13:55 IST

बीडमधील प्रकार : बालकल्याण समितीसमोर पीडिता हजर नाही

बीड : नाशिकमधील मालेगाव, बीड तालुक्यातील शिरूरच्या घटना ताज्या असतानाच, आता बीडमध्येही सहावीच्या वर्गात शिकणाऱ्या मुलीवर बलात्कार झाला. या प्रकरणात आरोपीलाही लगेच अटक झाली, परंतु मुलगी असुरक्षित असल्याची भावना ठेवत पालकांनी तिचे शिक्षणच बंद केले आहे. विशेष म्हणजे, तिच्या जबाबाला १४ दिवस उलटूनही तिला बालकल्याण समितीसमोर हजर केले नव्हते. जर वेळीच हजर केले असते तर हा प्रकार समुपदेशनाने थांबवता आला असता, असे तज्ज्ञांचे मत आहे.

५ नोव्हेंबर रोजी पीडितेची आई कामासाठी गेली असताना मुलगी खेळत होती. परत आल्यावर ती गायब दिसल्याने आईने शिवाजीनगर पोलिस ठाणे गाठून अपहरणाचा गुन्हा दाखल केला; परंतु नंतर मुलीने आपण मामाकडे गेल्याचे सांगितल्याने हा गुन्हा निकाली काढला जात होता. त्याच्या मंजुरीसाठी २२ नोव्हेंबर रोजी पत्रही पाठवले होते; परंतु अचानक यात नवा ट्विस्ट आला. २६ नोव्हेंबर रोजी मुलीने थेट पोलिस अधीक्षक कार्यालय गाठून बलात्कार झाल्याचे सांगितले. त्यानंतर तिचा जबाब घेण्यात आला. यात तिने ओळखीच्याच सूरजकुमार धोंडीराम खांडे (वय २२, रा. म्हाळसजवळा, ता. बीड) याने जबरदस्ती केल्याचे सांगितले. त्याप्रमाणे अपहरणाच्या गुन्ह्यात पोक्सो आणि ॲट्रॉसिटीचे कलम वाढवण्यात आले. पोलिसांनी लगेच खांडेला बेड्या ठोकल्या. तो सध्या कारागृहात आहे.

कलम वाढ; पत्रासाठी आईचा दोन दिवसापासून खेटेया प्रकरणात आधी अपहरण आणि नंतर पोक्सोसह ॲट्रॉसिटीचे कलम वाढवण्यात आले. मात्र, मुलीच्या प्रकरणात कोणते कलम वाढले, याचे लेखी पत्र किंवा कागदपत्र मिळावे म्हणून तक्रारदार असलेली पीडितेची आई बुधवार व गुरुवार असे दोन दिवस पोलिस अधीक्षक कार्यालयात आली. बालहक्क कार्यकर्ते तत्त्वशील कांबळे यांच्यासमवेत त्यांनी उपअधीक्षक पवार यांची भेटही घेतली; परंतु त्यांनी लेखी काहीच न देता केवळ तोंडी माहिती दिली, त्यामुळे आईने नाराजी व्यक्त करत घरी परतली. याआधीही शिरूर तालुक्यातील एका साडेसहा वर्षांच्या चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराच्या प्रकरणात पोलिसांनी पीडितेच्या आईला मदत न केल्याची तक्रार पोलिस अधीक्षकांकडे केलेली आहे; पण त्याची अद्यापही चौकशी झालेली नाही. हे प्रकरण ताजे असतानाच, हा नवा प्रकार उघडकीस आल्याने बीड पोलिसांवर तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

तपास योग्य पद्धतीनेगुन्ह्याचा तपास योग्य पद्धतीने सुरू आहे. तक्रारदाराला पूर्ण माहिती दिली जाईल. २४ तासांत बालकल्याण समितीसमोर हजर करावेच, असे बंधन नाही. आम्ही न्याय देण्याच्या भूमिकेत आहोत.- पूजा पवार, उपअधीक्षक, बीड

पोलिसांना पत्र देऊअत्याचार असो की इतर कोणत्याही प्रकरणातील पीडितेला पोलिसांनी २४ तासांत आमच्यासमोर हजर करणे आवश्यक आहे. काळजी व संरक्षणाच्या अनुषंगाने हे गरजेचे आहे. यात पोलिसांना पत्र देणार आहोत.-अशोक तांगडे, अध्यक्ष, बालकल्याण समिती, बीड

समुपदेशन गरजेचे होतेपीडितेच्या आईसह उपअधीक्षकांची भेट घेतली; परंतु त्यांनी कलम वाढीसह इतर पत्र देता येत नसल्याचे सांगितले. पीडितेला वेळीच समितीसमोर हजर केले असते, तर समुपदेशनाने हा प्रकार टळला असता.-तत्त्वशील कांबळे, बालहक्क कार्यकर्ते, बीड

English
हिंदी सारांश
Web Title : Minor Girl Raped in Beed, Education Halted Due to Fear

Web Summary : A sixth-grade girl was raped in Beed; the accused is arrested. Fearful parents stopped her education. Delay in presenting her to the Child Welfare Committee raises concerns. Police investigation is ongoing.
टॅग्स :Beed Crimeबीड क्राईम मराठी बातम्याsexual harassmentलैंगिक छळ